शहरं
Join us  
Trending Stories
1
'सुनिताला परवानगी देण्यात यावी...', केजरीवाल यांची न्यायालयाकडे नवी विनंती; अर्ज करत केल्या दोन मागण्या
2
अयोध्येला जाणाऱ्यांची संख्या घटली, स्पाइसजेटनं विमान सेवा बंद केली!
3
तो फोन शेवटचा! मुलांना मन लावून अभ्यास करण्याचा सल्ला अन्...; काळजात चर्र करणारी घटना
4
पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी वाराणसीबाबत अजय राय यांनी दिला असा मेसेज, वाढू शकतं मोदींचं टेन्शन
5
Fact Check : राष्ट्रगीत सुरू होतं आणि पंतप्रधान मोदी खुर्चीवर बसले?; जाणून घ्या 'सत्य'
6
गुरुचे नक्षत्र गोचर: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वृद्धी योग; वरदान काळ, तुमची रास कोणती?
7
Sushant Singh Death Anniversary : सुशांतच्या बहिणीने शेअर केला थ्रोबॅक व्हिडीओ; म्हणाली - 'हा राजकीय अजेंडा...'
8
BEST Bus Breakdowns: नुसता वैताग! बेस्ट बस भर रस्त्यात बंद पडण्याचं प्रमाण वाढलं, ६ महिन्यांत २११ वेळा घटना
9
सचिन तेंडुलकरला "तेंडल्या" म्हटल्याने राज ठाकरेंनी सिद्धार्थला सुनावले होते खडेबोल, अभिनेत्याने सांगितला किस्सा
10
'मधुबाला' फेम अभिनेत्रीने लग्नानंतर ९ वर्षांनी दिली गुडन्यूज, वयाच्या 38 व्या वर्षी देणार बाळाला जन्म
11
Kangana Ranaut : कंगनाला मिळणार इतका पगार; मोफत घरासह आलिशान सुविधा, खासदार झाल्यावर बदलणार आयुष्य
12
National News धक्कादायक! मजूर आणि शेतकऱ्यांच्या खात्यातून अचानक पैसे गायब; बँकेत घातला गोंधळ
13
Durgashtami: आज शुक्रवार आणि दुर्गाष्टमी, या संयोगावर घरच्याघरी करा लक्ष्मी कुंकुमार्चन; होतील अनेक लाभ!
14
"फोटोत दिसताय त्याप्रमाणे नेहमी हसत...", राज ठाकरेंच्या वाढदिवशी प्राजक्ताची खास पोस्ट
15
केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांची तरुणाईमध्ये क्रेझ; तुम्हाला माहितीये का बिहारच्या या लेकाचं शिक्षण?
16
खासदार होताच युसूफ अडचणीत; गुजरातमधील सरकारी भूखंडावर कब्जा केल्याप्रकरणी नोटीस
17
हमासनंतर आता हिजबुल्लाहनं उडवली इस्रायलची झोप, 250 रॉकेट डागले; मोठं युद्ध भडकण्याची शक्यता 
18
सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाचं आमंत्रण मिळाल्यावर पूनम ढिल्लो म्हणाल्या, "जहीर, प्लीज तिला..."
19
'आधी प्रभू रामचंद्रांची भक्ती केली, नंतर अहंकार आला, म्हणून...', RSS नेते इंद्रेश कुमार यांचा भाजपवर निशाणा
20
PHOTOS : अमेरिकेत 'सूर्या'चा रोमँटिक अंदाज! भारतीय शिलेदाराची पत्नीसोबत भटकंती

वुशूपटूला मृत्यूने हरवले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2018 12:25 AM

अपुºया सरावाने घेतला बळी : जखमी वुशू खेळाडू अनिल बोरसेचा पाच महिन्यांनी मृत्यू

ठळक मुद्देअपुर्ण सरावाने घेतला बळीजखमी वुशू खेळाडू अनिल बोरसेचा पाच महिन्यांनी मृत्यूपाच महिने दिली मृत्यूशी झुंज

जळगाव :  पाच महिन्यांपासून दुखापतींशी झुंज देणारा जळगावचा वुशू खेळाडू अनिल अरविंद बोरसे (वय २३) याचा मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवारी पहाटे पाच वाजता घडली. अनिल याला नांदेड येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत मणका आणि मज्जारज्जूंना गंभीर दुखापत झाली होती. शहरातील एका सलूनमध्ये काम करणाºया अरविंद बोरसे यांचा एकुलता मुलगा असलेल्या अनिलने पोलिसात भरती होण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यासाठी त्याने दोन ते तीन वेळा भरती प्रक्रियेत सहभाग घेतला. मात्र त्याला यश आले नाही. त्याच वेळी त्याला वुशू या मार्शल आर्ट खेळाच्या संघटनेच्या पदाधिकाºयांनी नोकरीसाठी प्रमाणपत्र मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्या आमिषाने तो नांदेड येथे १८ ते २१ आॅगस्टदरम्यान झालेल्या  १५ व्या राज्यस्तरीय वरिष्ठ अजिंक्यपद वुशू स्पर्धेत सानसू आणि ताऊलू या प्रकारात सहभागी झाला  होता. स्पर्धेच्या दोन फेºयांमध्ये खेळलेला अनिल अखेरच्या फेरीसाठी पात्र  ठरला. त्या वेळी काहीसा थकलेला असताना पहिल्या दोन मिनिटातच प्रतिस्पर्धी खेळाडूचा जोरदार फटका मानेला बसल्याने अनिल निपचित पडला. त्यानंतर पाच महिने त्याने मृत्यूशी झुंज दिली. त्याची ही झुंज मंगळवारी पहाटेच्या सुमारास संपली. नांदेड येथे झालेल्या दुखापतीनंतर संघ व्यवस्थापकांनी अनिलचे वडील अरविंद बोरसे यांना या प्रकाराची माहिती दिली आणि नांदेड येथे बोलावून घेतले. बोरसे यांना संघटना आणि संघ व्यवस्थापकांनी कोणतीही मदत केली नाही. नांदेड येथे केलेल्या उपचाराचा खर्चदेखील बोरसे यांनी केला. त्यानंतर अनिल याला शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रियादेखील करण्यात आली. काही काळाने त्याला हात हलवता येत होते. मात्र पुढच्या उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आले. दोन महिन्यांपूर्वी अनिलला रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. त्यानंतर घरीच उपचार सुरू होते. दोन दिवसांपूर्वी त्याला सर्दीमुळे श्वास घेण्यास त्रास जाणवत होता. त्या वेळी एका खासगी रुग्णालयात आणि त्यानंतर जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाच महिने मृत्यूशी झुंज दिल्यावर अनिल बोरसे पराभूत झाला.  अनिलच्या पश्चात आई - वडील,  बहिणी असा परिवार आहे.  

टॅग्स :Jalgaonजळगाव