शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

हरी रावजी पाटील यांच्या पुतळ्याचे आमडदे येथे पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:17 IST

आमडदे : कर्मवीर हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित साधनाताई प्रतापराव पाटील प्राथमिक, माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात ...

आमडदे : कर्मवीर हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित साधनाताई प्रतापराव पाटील प्राथमिक, माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात हरी रावजी पाटील यांच्या विसाव्या पुण्यस्मरण सप्ताहास सुरुवात झाली.

अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन प्रतापराव हरी पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन राजेंद्र पाटील, धर्मराज भोसले, युवराज भोसले, संजय भोसले, किशोर पाटील, अमोल पाटील, डॉ. रावसाहेब पाटील व साधनाई फाऊंडेशनचे संचालक हरीश भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी प्रतिमांचे पूजन मान्यवरांनी केले. यानंतर कर्मवीर हरी रावजी पाटील यांच्या भव्य पुतळ्याचे पूजन व पुष्पार्पण प्रतापराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक प्राचार्य आर. आर. वळखंडे यांनी केले.

स्वच्छता पंधरवड्यामित्त स्वच्छतेची शपथ सामूहिकरीत्या घेण्यात आली. स्वच्छता अभियान व रांगोळी स्पर्धा घेण्यात आली.

यावेळी पर्यावरण संवर्धन कोरोना महामारीवर उपाय बेटी बचाव बेटी पढाव अशा विषयांवरही रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. परीक्षण रंजना पाटील, अर्चना पाटील, सुषमा पाटील, प्रिया पाटील व भाग्यश्री भोसले यांनी केले. ही स्पर्धा तीन गटात घेण्यात आली. त्यातून विजेते काढण्यात आले. सूत्रसंचालन एस. पी. पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राथमिकचे मुख्याध्यापक विलास पाटील, पर्यवेक्षक बी. जे. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक शिक्षकेतरांनी यांनी परिश्रम घेतले.