आजी-आजोबा रंगले चित्राच्या दुनियेत, आकर्षक चित्रांनी वेधले लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 12:00 IST2017-12-24T11:56:58+5:302017-12-24T12:00:46+5:30
चित्रकला स्पर्धा

आजी-आजोबा रंगले चित्राच्या दुनियेत, आकर्षक चित्रांनी वेधले लक्ष
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 24- भाऊंचे उद्यान येथे सुरू असलेल्या कलाशिक्षक सचिन मुसळे यांच्या चित्रप्रदर्शनात शनिवारी आजी-आजोबा यांनी काढलेल्या चित्रांनी सर्वाचे लक्ष वेधून घेतले.
प्रदर्शनादरम्यान शनिवारी खास आजी-आजोबांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. त्याचे उद्घाटन शाकाहार सदाचारचे प्रणेते रतनलाल बाफना यांच्याहस्ते झाले. या स्पर्धेत तळवेल येथील 94 वर्षीय नारायण सीताराम लढे यांच्यासह त्यांचे 72 वर्षीय जावई सुरेंद्र धांडे यांनीही सहभाग घेतला. सास-या-जावईची ही जोडी सर्वाचे आकर्षण ठरली. या सोबतच अलका शिरसाठ, सुनंदा कोठावदे, अय्यूब खान, वर्षा ईखनकर, भागवत कोल्हे, निर्मला कुलकर्णी यांनी काढलेल्या चित्रांनी लक्ष वेधून घेतले. कीर्ती कोल्हे, जे.पी. वानखेडे, संजय सपकाळे, योगेश मुसळे, सुनील महाजन, राजेश यावलकर, अक्षय खेडकर, गजानन नेरकर, उदय नेरकर, गौरव सनस, मनिषा चिरमाडे आदींनी सहकार्य केले.