शेतात गळफास घेऊन मजुराची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 23:31 IST2019-05-15T23:30:07+5:302019-05-15T23:31:12+5:30
जळगाव - घरामागच्या शेतातील झाडाला दोरी बांधून हातमुजराने गळफास घेतल्याची घटना बुधवारी सकाळी ९़३० वाजेच्या सुमारास तालुक्यातील कानळदा येथे ...

शेतात गळफास घेऊन मजुराची आत्महत्या
जळगाव- घरामागच्या शेतातील झाडाला दोरी बांधून हातमुजराने गळफास घेतल्याची घटना बुधवारी सकाळी ९़३० वाजेच्या सुमारास तालुक्यातील कानळदा येथे उघडकीस आली़ गोकुळ सोमा सपकाळे (वय-४०) असे मयताचे नाव आहे़ याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़
कानळदा येथील गोकुळ हा हातमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. सकाळी कोणालाही काहीही न सांगता गोकुळ हा घरामागील शेताकडे गेला. त्यानंतर त्याने झाडाला दोरू बांधून गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. शेतात जाणाऱ्या एकाला नागरिकाला कुणीतरी आत्महत्या केल्याचे दिसून आले. नंतर परिसरातील नागरिकांनी त्याठिकाणी धाव घेतल्यानंतर आत्महत्या केलेला इसम गोकुळ असल्याचे समजल्यानंतर मृतदेह खाली उतरवून जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले़ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती गोकुळ यास मृत घोषित केले़ याबाबत तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गोकूळ याने आत्महत्या का केली, याबाबतच कारण समजू शकलेले नाही. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा असा परिवार आहे