Workers burned down the house at Chahardi in Chopda taluka | चोपडा तालुक्यातील चहार्डी येथे मजुराचे घर जळून खाक

चोपडा तालुक्यातील चहार्डी येथे मजुराचे घर जळून खाक

ठळक मुद्देघरी कोणी नसल्याने हानी टळलीपंचनामा करून मदत मिळण्याची मागणी

चोपडा, जि.जळगाव : तालुक्यातील चहार्डी येथील खदान परिसरात असलेल्या प्लॉट वस्तीत लालसिंग नरसिंग बारेला या आदिवासी इसमाचे कुडाचे घर जळून खाक झाले. २६ रोजी मध्यरात्री साडेबाराला ही घटना घडली. घरात कोणीही नसल्याने जीवित हानी टळली.
लालसिंग बारेला हे मजुरी काम करतात. या आगीत त्यांचे सुमारे ७० ते ८० हजाराचे नुकसान झाले. तसेच घरातील संसारोपयोगी वस्तू, कपडे घरातील दररोजचे वापरावयाची भांडी, धान्य यासह रोख रक्कम सात ते दहा हजार रुपये जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले.
हे घर पेटल्याने शेजारील दोन घरांनाही याची आस लागून त्यांचेही काहीअंशी नुकसान झाले आहे. या घरात रात्रपाळीमुळे शेतात कामाला गेल्यामुळे कोणीही नसल्याने कोणतीही जीवित हानी टळली.

Web Title:  Workers burned down the house at Chahardi in Chopda taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.