अमळनेरातील दगडी दरवाजाचे काम सुरू होईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 14:27 IST2021-06-06T14:26:31+5:302021-06-06T14:27:48+5:30
दगडी दरवाजाचे काम सुरू न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंकज चौधरी यांनी दिला आहे.

अमळनेरातील दगडी दरवाजाचे काम सुरू होईना
अमळनेर : शहराची ओळख असणारा दगडी दरवाजाचा बुरुज ढासळून दोन वर्षे झाली तरी अद्याप ह्यजैसे थेह्ण परिस्थिती कायम आहे. या दरवाजाचा विषय वेळोवेळी चर्चेत येत असतो. या दरवाज्याचे काम सुरू न झाल्यास आंदोलन केले जाईल, असा इशारा जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंकज चौधरी यांनी दिला आहे.
हेतुपुरस्कर दिरंगाईचा आरोप
पुरातत्व विभाग, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, मुख्याधिकारी यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून काम करण्यास भाग पाडले होते. परंतु पुन्हा या कामास हेतुपुरस्कर दिरंगाई होत असल्याचा आरोप चौधरी यांनी निवेदनाद्वारे केला आहे.
इतिहासाची साक्ष देणारा दगडी दरवाजा
अमळनेर शहराला सदैव इतिहासाची साक्ष देणारा प्रेरणादायी दगडी दरवाजा सुमारे दोन वर्षांपूर्वी ढासळला. राजकीय खेळीमुळे की हेतुपुरस्कर दुर्लक्षामुळे सुमारे ऑगस्ट २०२० पासून कार्यरंभ आदेश देऊनदेखील कामात आजपर्यंत कुठलीही विशेष प्रगती दिसत नाही.
१० दिवसात काम सुरू करा
मागील काळात संबंधित ठेकेदार यांना मोठ्या आजाराला सामोरे जावे लागले. परंतु त्यावर काही तरी मार्ग काढणे आवश्यक असतानादेखील आपल्या विभागामार्फत दुर्लक्ष केले जात आहे. हादेखील संशोधनाचा विषय आहे. येणाऱ्या १० दिवसात जर युद्धपातळीवर काम सुरू नाही झाले तर आम्ही उग्र आंदोलन छेडू, या आशयाचे निवेदन पंकज चौधरी यांनी दिले आहे.