नालेसफाईच्या कामांना अजूनही मिळाला नाही मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 12:18 PM2020-05-21T12:18:54+5:302020-05-21T12:19:07+5:30

जळगाव : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून मनपाची बरीच यंत्रणा कोरोनाच्या उपाययोजनांवर काम करीत आहे. मात्र, कोरोनाच्या उपाययोजनांवर काम ...

 The work of non-cleaning has not got a moment yet | नालेसफाईच्या कामांना अजूनही मिळाला नाही मुहूर्त

नालेसफाईच्या कामांना अजूनही मिळाला नाही मुहूर्त

Next

जळगाव : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून मनपाची बरीच यंत्रणा कोरोनाच्या उपाययोजनांवर काम करीत आहे. मात्र, कोरोनाच्या उपाययोजनांवर काम करत असताना मान्सूनपूर्व कामांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. मे महिना संपण्यात आला असतानाही मनपाकडून अद्याप मोठ्या नाल्यांच्या सफाईच्या कामांना सुरुवात झालेली नाही.
दरवर्षाप्रमाणे एप्रिल महिन्यातच उपनाल्यांचा सफाईच्या कामांना सुरुवात झाली. मात्र, मुख्य पाच नाल्यांचा सफाईच्या कामांना सुरुवात झालेली नाही. गेल्या वर्षी शहरात झालेल्या जोरदार पावसामुळे नाल्याच्या काठावरील अनेक घरांमध्ये पुराचे पाणी मोठ्या प्रमाणावर गेल्याचे प्रकार घडले होते.
यंदा अजून मनपाने याबाबत कोणतेही नियोजन आखले नसून मान्सून वेळेआधीच जर दाखल झाला. तर शहरात नालेसफाईच्या अभावामुळे मोठी समस्या निर्माण होऊ शकते. त्यातच मान्सूनपूर्व पावसातदेखील नाल्यांना पूर येण्याची शक्यता असते.
मात्र, महानगरपालिकेने अद्याप नियोजन न केल्याने कोरोनासोबतच पुराच्या समस्येलादेखील जळगावकराना सामोरे जावे लागण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

नाल्यालगतच्या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष
शहरातील मुख्य पाच नाल्यांलगत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. पावसाळ्यात या नाल्यांना पुर आल्यास अतिक्रमित घरांमध्ये पुराचे पाणी जाण्याची भीती असते. दरवर्षी मनपाकडून या अतिक्रमणधारकांना नोटीस दिली जाते. मात्र, प्रत्यक्षात कारवाई केली जात नाही. यंदातर मनपाने नोटीस देखील बजावलेली नाही. तसेच नाल्यांलगत संरक्षण भिंतीचे कामेही ठप्प आहेत. यासह जिर्ण इमारतीचे सर्वेक्षणही अद्याप झालेले नाही.

मुख्य पाच तर ६७ उपनाले
शहराच्या मुख्य परिसरातून लेंडी नाला जात असतो तर गणेश कॉलनी, मू.जे.महाविद्यालय, प्रेमनगर, भोईटेनगर परिसरातून दुसरा नाला जातो. तसेच पिंप्राळा व इतर भागातून ५ प्रमुख नाले वाहतात. तसेच शहरातील इतर प्रभागातून ६७ उपनाले वाहतात. शहरात दरवर्षी नाल्याला येणाऱ्या पुरामुळे शहरातील सखल भागात पाणी साचते. नाल्याला पाणी आल्याने गटारी तुंबतात व शहर जलमय होते. दरवर्षी मान्सूनच्या आधी आरोग्य आणि बांधकाम विभागाकडून २२ दिवसांचा कार्यक्रम आखला जातो. त्यानुसार जेसीबीच्या साहाय्याने प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्यात येत असते. मात्र, यंदा अद्यापही सुरुवात झालेली नाही. कोरोनाचे संकट मोठे असले तरी मान्सूनपूर्व कामांकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.

नाले झाले ओव्हरफ्लो
शहरात एकूूण पाच मोठे नाले आहेत. यामध्ये राष्टÑीय महामार्ग ते नेरी नाका स्मशान भूमी ते मन्यारवाडा पुलापर्यंच्या मुख्य लेंडी नाला आहे. या नाल्यात सध्यस्थितीत दोन्ही बाजूला मोठमोठी झुडुपे व गवत वाढले आहे. शिवाजी उद्यान स्मशान भूमी, मेहरूण एम.डी.एस. कॉलनी भागातील नाल्यांमध्येही मोठ्या प्रमाणात घाण पसरली आहे. ६७ उपनाल्यांची सफाई सध्यस्थिती सुरु असली तरी मनपाचे कर्मचारी संख्या कमी असल्याने ही सफाई अत्यंत संथ गतीने सुरू आहे. दरम्यान, मुख्य नाल्यांचा सफाईसाठी गेल्या पंधरा दिवसांपासून विदा प्रक्रिया राबविण्यात आली असली तरी अजूनही निविदा उघडण्यात आलेली नाही.

Web Title:  The work of non-cleaning has not got a moment yet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.