जळगाव मनपा निवडणुकीसाठी कामाला लागा : माजी मंत्री गुलाबराव देवकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 18:04 IST2018-03-26T18:04:37+5:302018-03-26T18:04:37+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

जळगाव मनपा निवडणुकीसाठी कामाला लागा : माजी मंत्री गुलाबराव देवकर
आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.२६ - मनपा निवडणूक पूर्ण ताकदनिशी लढविण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत करण्यात आला. ही बैठक माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी देवकर यांनी ब्लॉकनिहाय पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करुन जोमाने कामास लागण्याच्या सूचना दिल्या. मनपा निवडणुकीच्या दृष्टीने १ एप्रिलपासून पदाधिकाऱ्यांचा प्रभागनिहाय दौरा सुरु केला जाणार आहे. यावेळी प्रभागातील विविध समस्या सोडविण्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहे.
बैठकीस जिल्हा कार्याध्यक्ष विलास पाटील, महिला प्रदेश सरचिटणीस मंगला पाटील, युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष योेगेश देसले आदी उपस्थित होते.
कार्यकारिणी जाहीर
महानगराध्यक्ष नीलेश पाटील यांनी शहराची नूतन कार्यकारिणीही जाहीर केली. या कार्यकारिणीत कार्याध्यक्ष सिराजखान रज्जाक खान, वरिष्ठ उपाध्यक्ष अशपाक मिर्झा, संतोष पाटील, जाकीर पठाण यांचेसह सात उपाध्यक्ष, सात सरचिटणीस आदी पदाधिकारी व सदस्यांचा समावेश आहे.