जळगावात भाजपातील अंतर्गत वादामुळे कामांचा खोळंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 21:33 IST2018-08-11T21:29:13+5:302018-08-11T21:33:41+5:30
जिल्हा परिषदेत भाजपाअंतर्गत वादामुळे गेल्या वर्षभरापासून नेहमीच कामांना खोडा बसत आला आहे. मात्र याचे खापर एकमेकांवर फोडण्याचा प्रकार सध्या जिल्हा परिषदेत सुरु आहे.

जळगावात भाजपातील अंतर्गत वादामुळे कामांचा खोळंबा
ठळक मुद्देजिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांमधील वादएकमेकांवर खापर फोडण्याचा प्रकारविशेष सभेचे नियोजन बारगळले
जळगाव: जिल्हा परिषदेत भाजपाअंतर्गत वादामुळे गेल्या वर्षभरापासून नेहमीच कामांना खोडा बसत आला आहे. मात्र याचे खापर एकमेकांवर फोडण्याचा प्रकार सध्या जिल्हा परिषदेत सुरु आहे.
गेल्या वर्षी कामे मंजुरीवरुन सत्ताधाऱ्यांमध्येही एकवाक्यता नसल्याने निधी वेळेत खर्च होवू शकला नाही. आता यादृष्टीने प्रशासनाचे प्रयत्न असताना पदाधिकारी यांच्यातील वाद पुढे आले आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्यातील वादामध्ये विशेष सभेचे नियोजनही बारगळल्यातच जमा आहे.