महिलांचा गोल्डन स्टार्स संघाने मिळवला विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:53 IST2021-02-05T05:53:06+5:302021-02-05T05:53:06+5:30
जळगाव: येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट आयोजित सागर पार्कवर रोटरी प्रीमियर लीगचा अंतिम सामना रविवारी दुपारी होणार ...

महिलांचा गोल्डन स्टार्स संघाने मिळवला विजय
जळगाव: येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट आयोजित सागर पार्कवर रोटरी प्रीमियर लीगचा अंतिम सामना रविवारी दुपारी होणार आहे शनिवारी झालेल्या महिलांच्या सामन्यात गोल्डन स्टार्स संघाने वेस्ट क्वीनला पराभूत केले. गोल्डन स्टार्सच्या डॉ. अर्चना कोतकर यांनी सलग तीन षटकार लगावले. त्यांना सामनावीराचा बहुमान देण्यात आला. सायंकाळी महिलांच्या वेस्ट क्वीन विरुद्ध गोल्डन स्टार्स संघ खेळला गेला.
आज झालेल्या क्रिकेट सामन्यामध्ये स्टार्स स्ट्रायकर्स संघाला पाचोरा नाईट रायडर्स संघ अनुपस्थित असल्यामुळे विजयी घोषित करण्यात आला. वेस्ट एसपीसीसी संघाने चोपडा सुपर किंग्स् संघाला ४९ धावांनी पराभूत केले.
वेस्ट व्हिक्टर्स संघाला ईस्ट कमांडो संघाने नऊ गड्यांनी हरविले. शनिवारी झालेल्या सामन्यांमध्ये हितेश पटेल, अॅड. सागर चित्रे, भद्रेश शहा, सचिन पटेल, राजेश सांखला, हितेेश चांडक (अकोला), प्रसाद पाटोळे (नाशिक), नीरज मंत्री, तुषार चव्हाण, ब्रिजेश ठाकूर (अकोला) यांना सामनावीराचा सन्मान प्राप्त झाला. भद्रेश शहा यांनी नाबाद १२२ धावा झळकवल्या.