Women police station for drunkenness at Nagalwadi | दारूबंदीसाठी नागलवाडीच्या महिलांचा चोपडा पोलीस स्टेशनवर ठिय्या

दारूबंदीसाठी नागलवाडीच्या महिलांचा चोपडा पोलीस स्टेशनवर ठिय्याचोपडा : गावठी दारूमुळे गावात अनेकांचे संसार उद्धवस्त होत आहेत. त्यामुळे गावातून हातभट्टीची अवैध दारू विकणा-यांकडून पंधरा ते वीस महिलांनी दारू ताब्यात घेऊन थेट चोपडा शहर पोलीस स्टेशन गाठले. तेथे ठिय्या देऊन घोषणाबाजी केली.
१० रोजी दुपारी चार वाजता नागलवाडी गावातून हातभट्टीची अवैध दारू विकणा?्या लोकांकडून महिलांनी दारू ताब्यात घेऊन थेट चोपडा शहर पोलीस स्टेशन गाठले. अवैध मागार्ने विक्री होणारी हातभट्टीची दारू बंद झालीच पाहिजे, असा पवित्रा घेत शहर पोलीस स्टेशन जवळ ठिय्या आंदोलन केले. महिलांचा एल्गार पाहून पोलिसांची धांदल उडाली व तात्काळ चक्रे फिरू लागली. नागलवाडी गावात दारू विक्री करणा-या सर्व पाच ते सहा जणांविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी महिलांनी केली आहे. ठिय्यावेळी महिला अवैध दारू बंदी झालीच पाहिजे, अशा घोषणाही देत होत्या.

 

Web Title: Women police station for drunkenness at Nagalwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.