शिरसाळे येथे महिलेचा विनयभंग व मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:18 IST2021-07-30T04:18:34+5:302021-07-30T04:18:34+5:30
तालुक्यातील शिरसाळे येथील एक २७ वर्षीय महिला ही सायंकाळी घरी एकटी असताना झाडू मारत असताना दोन घराआड राहणार ...

शिरसाळे येथे महिलेचा विनयभंग व मारहाण
तालुक्यातील शिरसाळे येथील एक २७ वर्षीय महिला ही सायंकाळी घरी एकटी असताना झाडू मारत असताना दोन घराआड राहणार केशरलाल उर्फ भाऊ युवराज कोळी घरात घुसून आला आणि तिचा पदर ओढून विनयभंग केला. महिला ओरडून त्याच्यापासून सोडवणूक करायला लागली तेव्हा त्याने तिला मारहाण केली. त्याचवेळी महिलेचा जेठ श्यामकांत चुडामण जाधव, राकेश दिलीप जाधव, जितेंद्र गंभीर जाधव यांनी आवाज ऐकून महिलेची सुटका केली तेव्हा केशरलाल याने श्यामकांत जाधव यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
या गोंधळात केशरलालचा चुलत भाऊ विजय सुरेश कोळी, वडील युवराज भाऊलाल कोळी, काका सुरेश भावलाल कोळी हेही आले आणि त्यांनी महिलेस तिला सोडवायला आलेल्या जेठ, पती व इतरांनाही मारहाण केली. तसेच पोलिसात तक्रार केली तर तुम्हाला गावात राहणे मुश्कील करून देऊ, अशी धमकी दिली. महिलेच्या फिर्यादीवरून मारवड पोलीस स्टेशनला विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल विशाल चव्हाण करीत आहेत.