सर्पदंशाने महिलेचा मृत्यु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2020 22:40 IST2020-01-27T22:40:24+5:302020-01-27T22:40:41+5:30
जळगाव : सर्पदंशमुळे २८ वर्षीय महिलेचा मृत्यु झाल्याची घटना दि. २७ रोजी मध्यरात्री घडली. मयत महिलेच्या मृतदेहावर शासकीय वैद्यकीय ...

सर्पदंशाने महिलेचा मृत्यु
जळगाव : सर्पदंशमुळे २८ वर्षीय महिलेचा मृत्यु झाल्याची घटना दि. २७ रोजी मध्यरात्री घडली. मयत महिलेच्या मृतदेहावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात येवून मृतदेह नातेवायिकांच्या ताब्यात देण्यात आला.
याबाबत माहिती अशी की, संगिता किशोर चौधरी(वय २८, रा. सुप्रिम कॉलनी, जळगाव) असे मयत महिलेचे नाव असून दि. २६ रोजी दुपारी या महिलेला सर्पदंश झाला होता. सर्पदंश झाल्याचे लक्षात येताच तिला दुपारी २ वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जलगाव येथे दाखल करण्यात आले होते. दरम्यान, प्रकृती गंभीर असल्याने तिच्यावर आयसीयु विभागात उपचार सुरु असतांना मध्यरात्री १२:५० वाजता महिलेची प्राणज्योत मालावली. शवविछेदन करुन मृतदेह नातेवायिकांच्या स्वाधीन करण्यात आला