यावल तालुक्यातील आडगावात दोन कुटुंबांच्या मारहाणीत महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 00:03 IST2020-05-10T00:02:57+5:302020-05-10T00:03:32+5:30

आडगाव येथे दोन कुटुंबात झालेल्या हाणामारीत महिलेला जोरदार मार लागल्याने उपचारार्थ आणत असतान उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.

Woman killed in beating of two families in Adgaon in Yaval taluka | यावल तालुक्यातील आडगावात दोन कुटुंबांच्या मारहाणीत महिलेचा मृत्यू

यावल तालुक्यातील आडगावात दोन कुटुंबांच्या मारहाणीत महिलेचा मृत्यू

यावल, जि.जळगाव : तालुक्यातील आडगाव येथे दोन कुटुंबात झालेल्या हाणामारीत मंगलाबाई युवराज न्हावी (वय ४८) या महिलेला जोरदार मार लागल्याने यावल येथे उपचारार्थ आणत असतान उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. शनिवारी सायंकाळी ही घटना घडली.
सायंकाळी आडगाव येथील दोन कुटुंबात किरकोळ कारणावरून वाद होऊन हाणामारी झाली. यात मंगलाबाई न्हावी यांना जोरदार मार लागल्याने त्यांना यावल येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ आणले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. पो. नि. अरूण धनवडे व सहकाऱ्यानी तातडीने आडगावला जावून संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यात दोन महिलांसह दगडू खंडू कोळी, विनोद दगडू कोळी, सागर दगडू कोळी या संशयितांना ताब्यात घेतले आहे. याबाबतची फिर्याद मयत महिलेच्या मुलाने दिली. त्यावरून येथील पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Woman killed in beating of two families in Adgaon in Yaval taluka