अश्लील क्लिप पाठविणाऱ्याची........................... तडजोड करणाऱ्या महिलेस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:17 IST2021-08-01T04:17:09+5:302021-08-01T04:17:09+5:30
सूत्रांनुसार, नीलेश दिगंबर चौधरी (वय ४८, रा. श्रीनगर लोणारी हॉल) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, २७ जुलै रोजी ११ ते ३ ...

अश्लील क्लिप पाठविणाऱ्याची........................... तडजोड करणाऱ्या महिलेस अटक
सूत्रांनुसार, नीलेश दिगंबर चौधरी (वय ४८, रा. श्रीनगर लोणारी हॉल) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, २७ जुलै रोजी ११ ते ३ वाजेच्या सुमारास नीलेश व मित्र दुचाकीवरून पिंप्रीसेकम शिवार येथील शेतावर चक्कर मारण्यासाठी जात होते. तेव्हा लीना तल्हारे (५१) व तिच्यासोबतच्या दोन अनोळखी इसमांनी मोटारसायकल वरणगाव रोडच्या सर्व्हिस रोडवरील सायली हॉटेलच्या पुढील नॅशनल हायवेच्या ब्रिजखाली अडवून पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र नीलेश हाताला झटका मारून बांधकाम चालू असलेल्या नवजीवन कॉम्प्लेक्स बुकिंग ऑफिस गेला. तेथे लीना तल्हारे व तिच्यासोबतचे दोन अनोळखी इसम पाठलाग करत बुकिंग ऑफिसमध्ये आले. त्या ठिकाणी लीना हिने अजय गोडाले याला फोन करून बोलावून घेतले. नीलेशने मोबाईलवरून अश्लील क्लिप पाठवली होती. त्याची तडजोड म्हणून पाच लाख रुपयांची मागणी केली. रक्कम देण्यास नकार दिल्याने त्यातील शुभम पचरवाल याने हाताच्या बरगडीवर मारले व गालावर कानफटीत मारले. नीलेशकडून चारचाकी (एमएच-१९-सीव्ही-६४८७)चे लीना हिस विक्री केल्याचे जबरदस्तीने नोटरी करार कागदपत्र तयार करून गाडी घेऊन गेले. म्हणून लीना तल्हारे, अजय गोडाले, शुभम पचरवाल तीन अनोळखींविरुद्ध बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा भोये करीत आहेत.