विझल्या 'चुली' जरी मुखी मिळाला 'घास' !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 15:22 IST2020-04-03T15:20:45+5:302020-04-03T15:22:32+5:30

नगरसेवक संजय रतनसिंग पाटील आणि माजी नगरसेवक बाळासाहेब मोरे यांच्या दातृत्वातून ४५० मजूर कुटुंबांच्या चुली पुन्हा पेटल्या आहेत.

Wisley 'Chulie' though got a mouthful of 'Grass'! | विझल्या 'चुली' जरी मुखी मिळाला 'घास' !

विझल्या 'चुली' जरी मुखी मिळाला 'घास' !

ठळक मुद्देचाळीसगावच्या प्रभाग क्रमांक आठमधील मजूर कुटुंंबेप्रत्येकी ५०० रुपयांचे किराणा सामान दिले मोफतनगरसेवकांची माणुसकी

जिजाबराव वाघ
चाळीसगाव, जि.जळगाव : भयावह आजार 'कोरोना...' त्याची भीती अशी की उंबऱ्यातून बाहेर पाय ठेवायचा नाही... सगळेच लॉकडाऊन... रोजगारही गेला... पोट हातावरच... त्यामुळं चुली विझल्या... चिल्यापिल्यांची उपासमार... अशातच शुक्रवारी पेटला माणुसकीचा अंगार अन् मिळाला मुखी घास. प्रभाग क्रमांक आठमधील हे दृष्य एखाद्या चित्रपटाला साजेसं. मात्र नगरसेवक संजय रतनसिंग पाटील आणि माजी नगरसेवक बाळासाहेब मोरे यांच्या दातृत्वातून सत्यात उतरलं. त्यांच्या मदतीने ४५० मजूर कुटुंबांच्या चुली पुन्हा पेटल्या आहेत.
'कोरोना' संसर्गजन्य आजाराने रोजंदारी करणा-या कुटुंंबांच्या हक्काचा रोजगार हिसकावून घेतला. घराबाहेर न पडण्याची 'लक्ष्मणरेषा' त्यांच्या पोटावरही उमटली. लॉकडाऊन असल्याने सगळ्या रोजगार आणि उद्योग, व्यवसायांना टाळे लागले आहे.
प्रभाग क्रमांक आठमध्ये श्रमिक कुटुंंबांची संख्या सर्वाधिक असून मजूर रोजंदारी मिळवून उदरनिर्वाह करतात. गेल्या दहा दिवसात त्यांच्या हाताला काम न मिळाल्याने त्यांची उपासमार सुरू झाली आहे. ही बाब प्रभागाचे नगरसेवक व पालिकेचे भाजप गटनेते संजय रतनसिंग पाटील व माजी नगरसेवक बाळासाहेब मोरे यांच्या लक्षात आल्यानंतर ते मजुर कुटुंबांच्या मदतीला धावले.
बाळासाहेब मोरे यांच्या पत्नी याच प्रभागातील विद्यमान नगरसेविकाही आहे.
प्रत्येकी ५०० रुपयांचा किराणा
प्रभागातील सर्वच मजुर कुटुंबांचा शोध घेण्यात ४५० कुटुंबांची यादी तयार झाली. नगरसेवक पाटील व मोरे यांनी स्वखर्चाने प्रत्येक कुटुंबाला ५०० रुपयेप्रमाणे गहू, तांदूळ, साखर, बिस्कीट व तिखट अशा जीवनावश्यक वस्तूंचा किराणा सामान वितरीत केला. किराणा सामान मिळाल्याने मजुरांच्या वस्तीत आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Web Title: Wisley 'Chulie' though got a mouthful of 'Grass'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.