शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
4
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
5
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
6
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
7
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
8
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
9
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
10
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
11
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
12
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
13
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
14
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
15
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
16
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
17
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
18
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
19
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!

पारोळा येथील किसान महाविद्यालयाचे हिवाळी श्रमसंस्कार शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 16:17 IST

किसान कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विचखेडे, ता.पारोळा येथे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर घेण्यात आले.

ठळक मुद्देकिसान महाविद्यालयाच्या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचा समारोपसंस्कारशील जीवन जगले पाहिजे -माजी मंत्री डॉ.सतीश पाटील

पारोळा, जि.जळगाव : येथील किसान कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विचखेडे, ता.पारोळा येथे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर घेण्यात आले. सात दिवसीय शिबिराचा समारोप संस्थाध्यक्ष, माजी मंत्री डॉ.सतीश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.व्यासपीठावर जिल्हा बँक सदस्या तिलोत्तमा पाटील, प्रा.रंजना देशमुख, जि.प.सदस्य रोहन पाटील, विचखेडे गावचे सरपंच बाबूलाल माळी, माजी सरपंच विजय निकम, वि.का.संस्थेचे चेअरमन दिलीप निकम, शांताराम गढरी, रवींद्र शिंपी, महेंद्र निकम, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका लता बैसाणे, प्राचार्य डॉ.वाय. व्ही. पाटील, उपप्राचार्य डॉ.जी. एच .सोनवणे , डॉ .ए .टी.गव्हाळे आदी मान्यवर उपस्थित होते.शिबिरार्थी विद्यार्थ्यांमधून अश्विनी पवार, गायत्री पाटील, सुनीता माळी, विशाल पाटील यांनी मनोगतातून शिबिरात स्वयंशिस्त, स्वयंशिस्तीचे मिळालेले धडे, शिबीरात सुख-दु:ख कसे वाटून घेतले, या सात दिवसात आलेले अनुभव कथन केले.अध्यक्षस्थानावावरून डॉ सतीश पाटील म्हणाले की, या श्रमसंस्कार शिबिरातून मिळालेले संस्कार शिक्षण हे व्यक्तीच्या श्वासापर्यंत टिकून राहते. प्रत्येक विद्यार्थ्यांला संस्कारशील जीवन जगता आले पाहिजे. प्रत्येकाने आपापल्या व्यवसायाशी निष्ठा ठेवून काम केले तर उद्याची पिढी संस्कारक्षम झाल्याशिवाय राहणार नाही, असा आशावाद व्यक्त केला.या सात दिवसीय शिबिरात विद्यार्थ्यांनी गावात स्वछता मोहीम राबविली. गटारी स्वच्छ केल्या. विविध एकांकिका, नाटक पथनाट्यातून समाज प्रबोधन केले. ग्रामस्थासमोर अंधश्रद्धा, हुंडाबळी, एकच प्याला, व्यसनाधिनता यासारखे कार्यक्रम घेतले.सूत्रसंचालन प्रा.ए.एल.पवार, तर आभार महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.आशा बोरसे यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रा.संजय पाटील, प्रा. सूर्यवंशी, शशिकांत पाटील, प्रा. औजेकर, बंटी पाटील यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :collegeमहाविद्यालयParolaपारोळा