शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

भाजप वर्चस्वात सातत्य राखणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 12:28 IST

विश्लेषण

विजयकुमार सैतवालजळगाव : विधानसभा निवडणुकीसाठी २१ रोजी मतदान होत असून जळगाव जिल्ह्यात सत्ताधारी भाजपच्या उमेदवारीचा विचार केला तर यंदा पक्षाने तीन नवीन चेहऱ्यांना दिलेल्या संधीनंतर या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यात युती असतानाही मुक्ताईनगर मतदारसंघात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनीच बंडखोरी केल्यामुळे या मतदार संघासोबतच अमळनेरात गेल्या वेळी अपक्ष असलेले आमदार शिरीष चौधरी यांना भाजपने दिलेले संधी व चाळीसगाव मंगेश चव्हाण यांना दिलेल्या उमेदवारीकडे लक्ष लागले आहे. २०१४मधील विजयी सहा उमेदवारांपैकी चार जणांना पुन्हा भाजपने संधी दिली आहे तर दोन पराभूत उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले असून त्यातील अनिल भाईदास पाटील यांना अमळनेरात तर जगदीशचंद्र वळवी यांना चोपड्यातून राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारीदेखील दिली आहे. सध्या जळगाव जिल्ह्यातील ११ मतदार संघापैकी ६ ठिकाणी भाजपचे आमदार असून या निवडणुकीतही भाजपही वर्चस्व राखू शकेल की नाही, या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.२०१४च्या विधानसभा निवडणुकीवेळी युती नसल्याने भाजप व शिवसेना हे स्वतंत्रपणे लढले होते. त्या वेळी भाजपने सर्व ११ जागी उमेदवारी दिली होती. त्यात सहा मतदार संघात त्यांना विजय मिळविता आला.या विजयी उमेदवारांमधील जामनेर मतदार संघातून गिरीश महाजन हे पुन्हा निवडणूक रिंगणात आहेत. या सोबतच जळगाव शहर मतदार संघातून आमदार सुरेश भोळे यांच्या गळ््यात या वेळीही उमेदवारीची माळ पडली आहे. भुसावळमध्येही संजय सावकारे तर रावेरमध्ये हरिभाऊ जावळे पुन्हा निवडणूक रिंगणात आहेत. मात्र उन्मेष पाटील यांची खासदारकीपदी वर्णी लागली तर मुक्ताईनगरातून विजयी एकनाथराव खडसे यांना उमेदवारीच नाकारण्यात आली.दोघेही पराभूत या वेळी राष्ट्रवादीचे उमेदवार२०१४मध्ये अमळनेर मतदार संघातून भाजपचे उमेदवार असलेले अनिल भाईदास पाटील यांचा अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी यांनी पराभव केला. त्या नंतर पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि यंदाच्या निवडणुकीत ते राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहे. चोपडा मतदार संघातदेखील २०१४मध्ये भाजपकडून निवडणूक लढविणारे व पराभव झालेले जगदीशचंद्र वळवी हे देखील राष्ट्रवादीमध्ये गेले. तेदेखील या वेळी राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत.तिघा पराभूतांपैकी एकजण अलिप्त२०१४मध्ये पराभव झालेल्या तीन उमेदवारांपैकी या वेळी केवळ दोनच जण सक्रीय आहेत. जळगाव ग्रामीण मतदार संघातून पराभव झालेले पी.सी. पाटील यांचा या वेळीही महायुतीचे उमेदवार सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांना विरोध असून ते भाजपचे बंडखोर चंद्रशेखर अत्तरदे यांच्या प्रचारात आहेत.याशिवाय मच्छिंद्र पाटील (एरंडोल) हे चिमणराव पाटील यांचा प्रचार करीत आहेत. मात्र उत्तमराव महाजन (पाचोरा) हे प्रचारात दिसले नाही.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव