जळगाव शहरात फारकत घेतलेल्या पत्नीला पतीकडून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 21:39 IST2018-03-15T21:39:21+5:302018-03-15T21:39:21+5:30
न्यायालयात फारकत घेतलेल्या एका महिलेला रवी निरंजनदास कावणा, जयेश जयप्रकाश जैतवाणी व त्यांच्यासोबत असलेला एक जण अशा तिघांनी गुरुवारी सकाळी साडे नऊ वाजता ओरिआॅन स्कूलच्या आवारात मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी तिघांविरुध्द रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरात फारकत घेतलेल्या पत्नीला पतीकडून मारहाण
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,१५ : न्यायालयात फारकत घेतलेल्या एका महिलेला रवी निरंजनदास कावणा, जयेश जयप्रकाश जैतवाणी व त्यांच्यासोबत असलेला एक जण अशा तिघांनी गुरुवारी सकाळी साडे नऊ वाजता ओरिआॅन स्कूलच्या आवारात मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी तिघांविरुध्द रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवी कावणा याच्याशी संगिता (नाव बदलले आहे) यांचा २००८ मध्ये विवाह झाला होता. कावणा याच्यापासून संगिता यांना सागर हा ८ वर्षाचा मुलगा आहे. मुलगा आजारी असल्याचे प्रमाणपत्र शाळेत देण्यासाठी गेल्या असता तेथे या तिघांनी गैरवर्तन करुन मारहाण केली तसेच तुला मारुन टाकेल अशी धमकी दिल्याची तक्रार संगिता यांनी दिली आहे. त्यानुसार मारहाण व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.