खिडकीतून रोकड असलेली महिलेची पर्स लांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 12:04 IST2019-07-26T12:03:43+5:302019-07-26T12:04:01+5:30

जळगाव : कुलुप लावलेल्या घराच्या खिडकीतून आकोड टाकून पलंगावर ठेवलेली वैशाली तुकाराम महाजन यांची पर्स चोरट्यांनी लांबविल्याची घटना पिंप्राळा ...

Widowed the purse of a woman holding a window | खिडकीतून रोकड असलेली महिलेची पर्स लांबविली

खिडकीतून रोकड असलेली महिलेची पर्स लांबविली

जळगाव : कुलुप लावलेल्या घराच्या खिडकीतून आकोड टाकून पलंगावर ठेवलेली वैशाली तुकाराम महाजन यांची पर्स चोरट्यांनी लांबविल्याची घटना पिंप्राळा भागात उघडकीस आली आहे. या पर्समध्ये दहा हजार रुपये रोख व मोबाईल होता. याप्रकरणी गुरुवारी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैशाली महाजन या कुटुंबासह पिंप्राळा परिसरातील एकमुखी दत्त मंदिराजवळ वास्तव्यास आहेत. मुलगी आजारामुळे खासगी दवाखान्यात दाखल आहे. २४ रोजी रात्री घराच्या दरवाजाला कुलुप लावून त्या दवाखान्यात गेल्या होत्या.गुरुवारी सकाळी घरी आल्या असता हा प्रकार उघड झाला. त्यांनी लागलीच रामानंद नगर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली, त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. तपास मनोज बाविस्कर करीत आहेत.

Web Title: Widowed the purse of a woman holding a window

टॅग्स :Jalgaonजळगाव