२८ हजारांची लाच घेताना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:17 IST2021-07-31T04:17:21+5:302021-07-31T04:17:21+5:30
यावल, जि. जळगाव : रस्त्याची वर्कऑर्डर काढून देण्यासाठी ठेकेदाराकडून २८ हजारांची लाच घेताना यावल नगर परिषदेचा मुख्याधिकारी बबन ...

२८ हजारांची लाच घेताना
यावल, जि. जळगाव : रस्त्याची वर्कऑर्डर काढून देण्यासाठी ठेकेदाराकडून २८ हजारांची लाच घेताना यावल नगर परिषदेचा मुख्याधिकारी बबन गंभीर तडवी,
(५४) याला त्याच्याच कार्यालयात रंगेहाथ पकडण्यात आले. शुक्रवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही धडक कारवाई केली.
यावल येथील वाणी गल्लीतील रस्त्याच्या कामाचे ऑर्डर काढून देण्याच्या मोबदल्यात बबन तडवी (ह.मु. रा. राजोरी, ता. पाचोरा, जि. जळगाव.
रा. मातृस्नेहा हाऊसिंग सोसायटी ई-विंग, शहाड रेल्वे स्टेशनच्या मागे, कल्याण) याने पंचासमक्ष २८ हजार रुपयांची लाचेची मागणी केली व ही रक्कम आपल्या व कार्यालयातच घेतली. त्याला लागलीच अटक करण्यात आली.
तडवी याला ताब्यात घेतल्यानंतर पथक जळगावकडे रवाना झाले. मुख्याधिकारीपद स्वीकारल्यानंतर तडवी हा नेहमी चर्चेत राहिला आहे.