शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

विवाह सुरु असतानाच मंगल कार्यालयात पालिकेचे पथक धडकले अन्...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 22:53 IST

लग्न सुरु असतानाच मंगल कार्यालयात पालिकेचे पथक धडकले अन् एकच धावपळ उडाली.

ठळक मुद्देपाचोऱ्यातही कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन

लोकमत न्यूज नेटवर्क

पाचोरा : कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी केली जात असतानाच पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील दोन मंगल कार्यालयात लग्न समारंभ सुरू असताना पाचोरा पालिकेकडून दंडात्मक कारवाई व पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली आहे. लग्न सुरु असतानाच मंगल कार्यालयात पालिकेचे पथक धडकले अन् एकच धावपळ उडाली.

भडगाव रोड आशिर्वाद हॉल व स्वामी लॉन्स या दोन्ही मंगल कार्यालयात लग्न समारंभाचे कार्यक्रम होत असताना कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले. यात दोन्ही कार्यालयात लग्न समारंभात मोठ्या प्रमाणात गर्दी जमून आली. यामुळे लग्न समारंभ ५० व्यक्तीमध्येच करण्यात यावे. या नियमाचे उल्लंघन होत प्रचंड गर्दी झाली होती. यामुळे या कार्यालयांवर पाचोरा नगरपालिका कर्मचाऱ्यांनी  रुपये १० हजार दंडात्मक कारवाई केली असून पाचोरा पोलिसांकडून कार्यालयावर  कार्यालय मालकांवर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे तर १२जणांवर विना मास्कबाबत कारवाई केली.

यावेळी पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील, पोलीस उपनिरीक्षक गणेश चोभे यांचेसह पोलीस कर्मचारी नगरपालिकेचे जाधव यांचे पथक मंगल कार्यालयात शुभारंभ सुरू असतानाच आल्याने वऱ्हाडी मंडळींची धांदल उडाली. अर्ध्या तासात कार्यालये खाली झाली.

टॅग्स :JalgaonजळगावPachoraपाचोराcorona virusकोरोना वायरस बातम्याmarriageलग्नMuncipal Corporationनगर पालिका