वाहनात पेट्रोल भरताना भडका उडाल्याने दोघे भाजले, रूग्णालयात उपचार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2022 11:47 IST2022-05-05T10:50:11+5:302022-05-05T11:47:54+5:30
जळगाव : एका दुचाकीतून दुस-या दुचाकीत पेट्रोल भरत असताना अचानक भडका उडाला. यात दोन तरूण ८० ते ९० टक्के ...

वाहनात पेट्रोल भरताना भडका उडाल्याने दोघे भाजले, रूग्णालयात उपचार सुरू
जळगाव : एका दुचाकीतून दुस-या दुचाकीत पेट्रोल भरत असताना अचानक भडका उडाला. यात दोन तरूण ८० ते ९० टक्के भाजल्याची घटना सोमवारी रात्री वरणगाव येथे घडली. दोघा तरूणांवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहे. या दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.
वरणगाव येथील शंकर हरि पवार (१८) व त्याचा मित्र दीपक किशोर भील (१८) हे दोघं सोमवारी रात्री दुचाकी घेऊन घराबाहेर निघाले. वाटेत पेट्रोल संपल्यामुळे एका दुचाकीतून त्यांच्या दुचाकीत पेट्रोल भरत होते. त्यावेळी अचानक पेट्रोलचा भडका उडाला. यात शंकर आणि दीपक दोन्ही भाजले गेले. त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले आहे. दोघांवर उपचार सुरू आहे. तर दोन्ही तरूण ८० ते ९० टक्के भाजले असल्याची माहिती वैद्यकीय अधिका-यांनी दिली.