कुटूंबीय गच्चीवर असताना सिलिंडर, दुचाकी घेवून चोरटे पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 13:04 IST2020-05-18T13:03:53+5:302020-05-18T13:04:04+5:30

जळगाव : कुटुंबीय घराला कुलूप लावून गच्चीवर झोपण्यासाठी गेले असताना बंद घर पाहून रात्रीच चोरट्यांनी कडीकोयंडा तोडत आत प्रवेश ...

While the family is on the terrace, take the cylinder, bike and pass the thief | कुटूंबीय गच्चीवर असताना सिलिंडर, दुचाकी घेवून चोरटे पसार

कुटूंबीय गच्चीवर असताना सिलिंडर, दुचाकी घेवून चोरटे पसार

जळगाव : कुटुंबीय घराला कुलूप लावून गच्चीवर झोपण्यासाठी गेले असताना बंद घर पाहून रात्रीच चोरट्यांनी कडीकोयंडा तोडत आत प्रवेश केला. घरातील सर्व साहित्याची उलथापालथ करूनही मौल्यवान वस्तू दागिने, रोकड न मिळाल्याने चोरट्यांनी चक्क स्वयंपाक घरातील सिलिंडर आणि घरासमोरील दुचाकी चोरून नेल्याचा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला. जिल्हापेठ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
प्रेमनगर परिसरातील लक्ष्मण नगरात प्लॉट क्र.(०८/१) येथे योगेश वामन वाणी (कामळस्कर ) हे पत्नी कांचन, मुलगा आदित्य, मुलगी समीक्षा आदी कुटुंबीयांसोबत वास्तव्यास आहे. फ्लॅट,जागा खरेदी-विक्रीचा व्यवसाय करून ते घरचा उदरनिर्वाह करतात़ तापमानात कमालीची वाढ झाल्यामुळे सद्या प्रचंड उकाडा जाणवत असल्याने गच्चीवर मोकळ्या हवेत वाणी कुटुंबीय झोपायला जातात. नेहमी प्रमाणे शनिवार रोजी घराला कुलूप लावून संपूर्ण कुटुंबीय गच्चीवर झोपण्यासाठी गेले़ घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागील दाराचा कडीकोयंडा तोडून आत चोरी केली. घरातील कपाटातील आणि इतर सर्व साहित्याची उलथापालथ करून चोरट्यांच्या हातात काहीच लागले नाही.

पोलिसात गुन्हा दाखल
चोरट्यांना संपूर्ण घर शोधूनही काहीच सापडले नाही, म्हणून चोरट्यांनी स्वयंपाक घरातील सिलिंडर आणि कंपाउंडमध्ये उभी असलेली दुचाकी (एम.एच.१९़ ए.के. ६३३३) चे हॅण्डल लॉक तोडून सिलेंडरसह दुचाकी चोरून नेली. तर, योगेश वाणी यांचा मुलगा आदित्य याची मोपेडचे हॅण्डल लॉक तोडण्याचा प्रयत्न करूनही तोडता न आल्याने ती सुरक्षित राहिली. योगेश वाणी यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: While the family is on the terrace, take the cylinder, bike and pass the thief