शहरं
Join us  
Trending Stories
1
"काही लपवण्याचे कारण नाही, कुठलीही जुनी आठवण..."; राज ठाकरेंसोबतच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंचे भाष्य
2
सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन काँग्रेस भडकली; देशभरातील ईडी कार्यालयांबाहेर उद्या करणार आंदोलन
3
IPL 2025 : चहल ठरला PBKS च्या 'ब्लॉकबस्टर' शोचा हिरो! प्रीतीनं गळाभेट घेत थोपटली फिरकीपटूची पाठ
4
ऐनवेळी भाषणास संधी नाही, अजितदादांचा मोठा निर्णय; म्हणाले, “मी अन् एकनाथरावांनी ठरवलेय की...”
5
IPL 2025 : चहलनं फिरवली मॅच! अल्प धावसंख्येचा बचाव करताना KKR ला रोखत पंजाबनं रचला इतिहास
6
"आमच्याविषयी बोलू नका, स्वतःचा रेकॉर्ड पाहा"; वक्फ कायद्यावरुन बोलणाऱ्या पाकला भारताने फटकारलं
7
आता अशा 'लाडक्या बहि‍णींना' १५०० रुपयांऐवजी केवळ ५०० रुपयेच मिणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं!
8
"धमकावण्याचा प्रयत्न...!"; सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याविरुद्ध ED ने आरोपपत्र दाखल केल्यावरून काँग्रेस भडकली
9
तुमचे १०० बाप खाली आले तरी शिवसेनेचे अस्तित्व संपवता येणार नाही; ठाकरेंचा नाशिक दौरा, टिझर आला
10
PM मोदींच्या गुजरातमधून सुरुवात, काँग्रेसमध्ये नवचैतन्य येणार; राहुल गांधींचा प्लान काय?
11
PBKS vs KKR : हा तर IPL मधील बिग फ्रॉड! वरुण चक्रवर्तीच्या जाळ्यात फसल्यावर ग्लेन मॅक्सवेल ट्रोल
12
ईडीची सहारा समूहावर मोठी कारवाई! लोणावळ्यातील अ‍ॅम्बी व्हॅलीची ७०७ एकर जागा जप्त
13
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का; MUDA प्रकरणात लोकायुक्त पोलिसांच्या क्लीन चिटवर न्यायालय समाधानी नाही
14
१०० कोटींच्या ऑर्डरची बतावणी करत बिहारमध्ये बोलावून खून..! पुण्यातील उद्योजकाच्या हत्येने खळबळ
15
"लाडक्या बहिणींच्या मतांची किंमत आता ५०० रुपयांवर आली, उद्या...!"; राऊतांचा हल्लाबोल
16
PBKS vs KKR : जुन्या संघावर राग काढायचं सोडा एक धाव नाही काढली; श्रेयसच्या पदरी पडला सातवा भोपळा!
17
Russia Ukraine War : युक्रेनमध्ये अमेरिकेच्या सर्वात शक्तिशाली फायटर जेटच्या चिंधड्या! रशियाच्या 'या' मिसाइलनं केली कमाल; टेंशनमध्ये आला पाकिस्तान
18
दानवेंसोबतचा वाद मातोश्रीवर मिटला! ठाकरेंची भेट घेतल्यावर खैरे म्हणाले, “आम्ही दोघे आता...”
19
अयोध्येतील राम मंदिर बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, तामिळनाडूतून ईमेल, सुरक्षा यंत्रणा अलर्ट!
20
मंत्रालयातल्या निवृत्त कर्मचाऱ्याने सायबर फसवणुकीमुळे संपवले जीवन; आरोपीला गुजरातमधून अटक

पोलीस दलात चाललयं तरी काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 14:48 IST

जिल्हा पोलीस दलाला काही तरी ग्रहण लागलय की काय? अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. गेल्या महिन्यात १८ रोजी निंबोल येथे विजया बॅँकेत दरोड्याच्या प्रयत्नात बॅँकेच्या सहाय्यक व्यवस्थापकाची गोळ्या झाडून हत्या झाली. त्यानंतर खुनाच्या एकापाठोपाठ घटना घडू लागल्या.

ठळक मुद्दे  विश्लेषणचो-या, घरफोड्या वाढल्याखून व दरोड्याच्या घटना ठरताहेत आव्हान

सुनील पाटीलजळगाव : जिल्हा पोलीस दलाला काही तरी ग्रहण लागलय की काय? अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. गेल्या महिन्यात १८ रोजी निंबोल येथे विजया बॅँकेत दरोड्याच्या प्रयत्नात बॅँकेच्या सहाय्यक व्यवस्थापकाची गोळ्या झाडून हत्या झाली. त्यानंतर खुनाच्या एकापाठोपाठ घटना घडू लागल्या. जळगाव शहरात मू.जे.महाविद्यालयाचा मुकेश सपकाळे या निष्पाप विद्याथ्यार्ची हत्या, बोदवडजवळ तृतियपंथीची हत्या, पाचोरा व चाळीसगाव तालुक्यातील खून या घटनांना जिल्हा हादरलेला असतानाच बांबरुड राणीचे येथे माजी आमदाराच्या पुतण्याच्या घरात भरदिवसा शस्त्रधारी गुंडांनी दरोडा टाकला. निंबोल व बाबंरुड या दोन्ही घटना पोलीस दलासाठी आव्हान ठरल्या आहेत.  विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.छेरिंग दोरजे यांनी निंबोल दरोड्याच्या तपासासाठी चार दिवस जळगावात ठाण मांडले, त्यानंतर आता पुन्हा ते जिल्ह्यात दाखल झाले.आतापर्यंत झालेल्या तपासाचा त्यांनी आढावा घेतला, मात्र त्यात ठोस असे काही निष्पन्न झालेले नाही. खुन व दरोड्याच्या घटनांनी यंत्रणा हवालदील झालेली असतानाच जळगाव शहरात चो-या व घरफोड्यांच्या घटनांनी डोके वर काढले आहे. गेल्या दीड महिन्यातील असा एकही दिवस नाही की, त्या दिवशी जळगाव शहरात चोरी किंवा घरफोडी झालेली नाही. या घटनांमुळे जळगावकरांच्या मनात भीतीचे वातावरण पसरलेले असताना पोलीस दलाता मात्र कमालीची शांतता आहे. एकाही प्रभारी अधिका-याला किंवा गुन्हे शोध पथकाला गुन्हे घडू नये म्हणून काही उपाययोजना कराव्यात असे वाटत नाही.   शहरातील गुन्हे शोध पथके निष्क्रिय ठरले असून फक्त आर्थिक व्यवहाराशी संबंधितच प्रकरणात काम करताना दिसत आहे. घरफोड्या, चो-या होवोत अथवा खून याच्याशी काहीही घेणंदेणं नाही असेच चित्र शहरात निर्माण झाले आहे. झालेल्या घरफोड्या व चोरीच्या घटना उघडकीस आणण्यासाठी कोणीच मनापासून प्रयत्न करताना दिसत नाही, किंवा वरिष्ठ अधिकारीही हा विषय गांभीयार्ने घेत नाहीत,म्हणूनच एकही घटना आतापर्यंत उघडकीस आलेली नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव