शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

कंडारेकडे सापडलेल्या डायरीत दडलयं काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:11 IST

जळगाव/ पुणे : बीएचआर पतसंस्थेतील आर्थिक घोटाळ्यातील मुख्य सुत्रधार जितेंद्र बाबुराव कंडारे याला पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या प‌थकाने इंदूर ...

जळगाव/ पुणे : बीएचआर पतसंस्थेतील आर्थिक घोटाळ्यातील मुख्य सुत्रधार जितेंद्र बाबुराव कंडारे याला पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या प‌थकाने इंदूर येथून जेव्हा ताब्यात घेतले तेव्हा त्याच्याकडे एक डायरी सापडली आहे. या डायरीत नेमके काय आहे, हे पोलिसांनी जाहिर केलेले नाही. मात्र या डायरीमुळे गूढ अधिकच वाढले असून मंगळवारी दिवसभर याच डायरीची चर्चा होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डायरीत अनेकांची नावे असल्याचे सांगण्यात येत आहे. कंडारे यांच्या अटकेने याप्रकरणात आणखी कोणा कोणाचा सहभाग आहे, याचा खुलासा होण्याची शक्यता असून आणखी काही मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इंदूर येथे सोमवारी रात्री एका वसतीगृहात वास्तव्याला असलेल्या जितेंद्र कंडारे याला पुणे पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला इंदूर येथील न्यायालयात हजर करुन पुण्याला आणण्यासाठी ट्रॉझिंट वॉरंट घेण्यात आले. त्यानंतर हे पथक त्याला घेऊन पुण्याकडे निघाले असून बुधवारी सकाळी पुण्यात येईल. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

जळगाव व इतर काही शहरात आर्थिक गुन्हे शाखेने एका पाठोपाठ छापे घालून या प्रकरणात आतापर्यंत १८ जणांना अटक केली आहे. अवसायक जितेंद्र कंडारे हा गेल्या ७ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. तरीही पोलिसांनी त्याचा माग घेणे सोडले नव्हते. कंडारे हा मध्य प्रदेशातील इंदूर येथील एका वसतीगृहात वास्तव्य करुन रहात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याबरोबर पुण्यातून एक पथक तातडीने इंदूरला रवाना झाले. त्यांनी सोमवारी रात्री उशिरा कंडारे याला हॉटेलमधून ताब्यात घेतले. त्याच्याकडील तपासातून या संपूर्ण आर्थिक घोटाळ्याचे सूत्र पुढे येण्यास मदत होणार आहे.

३५ हजार ठेवीदार आणि ८०० कोटींचा घोटाळा

बीएचआर पतसंस्थेचे महाराष्ट्रासह इतर राज्यात मिळून ३५ हजारांहून अधिक ठेवीदार आहेत. या आर्थिक घोटाळ्याच्या पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासामध्ये आतापर्यंत ८०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणामध्ये ६५० हून अधिक लोक गुंतवले असून कंडारे याला अटक केल्यामुळे यामागील सुत्र आता अधिक स्पष्टपणे पुढे येणार आहे.

जेवणासाठी आला अन् पोलिसांच्या जाळ्यात सापडला

जितेंद्र कंडारे हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झाला होता. तो मध्य प्रदेशासह अन्य दोन ते तीन राज्यांमध्ये सातत्याने फिरत होता. गेल्या काही दिवसांपासून तो इंदूरमधील एका वसतीगृहामध्ये आपली ओळख लपवून रहात होता. तो संपूर्ण वेळ खोलीत रहात असे. पुणे पोलिसांना त्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी या वसतीगृहावर पाळत ठेवली होती. सोमवारी रात्री तो जेवणासाठी खाली आला. त्यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

कोट...

बीएचआर आर्थिक घोटाळा प्रकरणात जितेंद्र कंडारे आणि सुनील झंवर हे दोघे मुख्य सुत्रधार आहेत. त्यापैकी झंवर हा अजूनही फरार आहे. जितेंद्र कंडारे याला सोमवारी रात्री इंदूरमधून अटक करण्यात आली आहे. त्याला पुण्यात आणून बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

- भाग्यश्री नवटके, पोलीस उपायुक्त आर्थिक गुन्हे शाखा, पुणे