जळगावातील बालकाचे अपहरण करून नेले पश्चिम बंगालला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 12:35 IST2018-06-18T12:35:52+5:302018-06-18T12:35:52+5:30

बाजारात घेऊन जाते असे सांगून सुप्रिम कॉलनीतील सोनाली बंगाली (रा़ पश्चिम बंगाल) या महिलेने शेजारीच राहणाऱ्या गोलू उर्फ उमर जावेद खान (वय-१०) या बालकाचे अपहरण करून पश्चिम बंगालमध्ये नेल्याची धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली आहे़

West Bengal has been kidnapped by the child of Jalgaon | जळगावातील बालकाचे अपहरण करून नेले पश्चिम बंगालला

जळगावातील बालकाचे अपहरण करून नेले पश्चिम बंगालला

ठळक मुद्देअपहरण केलेला बालक सुप्रिम कॉलनीतीलबाजारात घेऊन जाण्याचा महिलेने केला बहाणापश्चिम बंगाल येथील महिलेस केली पोलिसांनी अटक

जळगाव : बाजारात घेऊन जाते असे सांगून सुप्रिम कॉलनीतील सोनाली बंगाली (रा़ पश्चिम बंगाल) या महिलेने शेजारीच राहणाऱ्या गोलू उर्फ उमर जावेद खान (वय-१०) या बालकाचे अपहरण करून पश्चिम बंगालमध्ये नेल्याची धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली आहे़
दरम्यान, या महिलेस पश्चिम बंगाल येथील स्थानिक पोलिसांनी अटक केली असून बालकाला ताब्यात घेतले आहे़ त्या महिलेस व बालकास ताब्यात घेण्यासाठी रविवारी एमआयडीसी पोलिसांचे एक पथक पश्चिम बंगाल येथे रवाना झाले आहे़
बिलकीस जावेद खान या पती जावेद यांच्यासह अरबाज, दानीश व उमर या तीन मुलांसह सुप्रिम कॉलनीत ईमामत खान मोहब्बत खान यांच्या मालकीच्या घरात भाड्याने राहत आहेत़ यावेळी त्यांच्या शेजारी सोनाली बंगाली (पूर्ण नाव माहित नाही) ही महिला वास्तव्यास आहे़ १० जून रोजी सकाळी साडे नऊ वाजता बिलकीस या घराजवळीच तोलकाटा येथे पाणी भरण्यासाठी गेल्या़ काही वेळानंतर घरी परतल्यावर मुलगा दानीश याने सांगितले की, शेजारील सोनाली बंगाली ही महिला बाजारात जात असल्याचे सांगत उमर यास सोबत घेऊन गेली आहे़ सायंकाळ होऊन देखील मुलगा परत न आल्यामुळे बिलखीस यांनी सोनाली हिला फोन केला़ मात्र, तिचा फोन बंद येत होता़
चार ते पाच दिवस उलटून उमर हा घरी न परतल्यामुळे त्यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला तक्रार दिली़ त्यानुसार सोनाली हिच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला. आपला मुलगा पं.बंगालमध्ये असल्याची माहिती मिळताच बालकाच्या आईला धक्का बसला.

Web Title: West Bengal has been kidnapped by the child of Jalgaon