पुष्पवृष्टी व मंगलवाद्याने पहिल्या कन्येचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:20 IST2021-07-14T04:20:05+5:302021-07-14T04:20:05+5:30
रुग्णालयातून सुटी झाल्यावर गुलाबपुष्पांनी सजविलेल्या कारमधून मातेसह कन्येला घरी आणले. विद्युत रोषणाईने सजविलेल्या घरात ‘लक्ष्मी आली घरा, तोचि दिवाळी-दसरा’ ...

पुष्पवृष्टी व मंगलवाद्याने पहिल्या कन्येचे स्वागत
रुग्णालयातून सुटी झाल्यावर गुलाबपुष्पांनी सजविलेल्या कारमधून मातेसह कन्येला घरी आणले. विद्युत रोषणाईने सजविलेल्या घरात ‘लक्ष्मी आली घरा, तोचि दिवाळी-दसरा’ असे आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले. घराचा उंबरठा ओलांडल्यावर धान्याने भरलेला मंगलकलश कन्येच्या चरणस्पर्शाने वाढविण्यात आला. फुलांच्या पाकळ्यांवर अच्छादिलेल्या शुभ्र वस्त्रावर कन्येच्या पावलांचे ठसे कुमकुमने उमटविण्यात आले.
घरात अंथरलेल्या फुलांच्या पाकळ्यांवरून कन्या व माता-पित्याचे कुलदेवतेच्या देव्हाऱ्यापर्यंत तांब्याचे ताट, शंख वाजवत, पुष्पवृष्टी करीत स्वागत करण्यात आले. तसेच मिठाई वाटप करण्यात आली. महिला मंडळाने राजस्थानी, मारवाडी भजन-गीत-गायनाने कन्येला व मातेला शुभेच्छा दिल्या.
120721\12jal_4_12072021_12.jpg
पुष्पवृष्टी व मंगल वाद्याने पहिल्या कन्येचे स्वागत