शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

छत्तीसगडमधील मोहंम्मद फैजखान यांच्या गोसेवा सद्भावना पदयात्रेचे रावेरात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 12:24 AM

राष्ट्रीय गोसेवा प्रकोष्ठ मुस्लिम मंचचे राष्ट्रीय संयोजक मोहंम्मद फैजखान (रायपूर, छत्तीसगड) यांनी गोमाता हीच साऱ्या विश्वाची जननी असून, गोसेवेची असलेली द्वेषभावना प्रेमात परावर्तित करण्याची जनजागृती करताना समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचण्यासाठी १४ हजार किलोमीटरची गोसेवा सद्भावना पदयात्रा गत दोन वर्षांपासून आरंभली आहे.

ठळक मुद्देदोन वर्षात लद्दाख ते अमृतसर पदयात्रेतील ११ हजार ५०० कि. मी. गोसंवर्धनासाठी पायी प्रवासगोसेवा सद्भावना पदयात्रा गत दोन वर्षांपासून

रावेर, जि.जळगाव : राष्ट्रीय गोसेवा प्रकोष्ठ मुस्लिम मंचचे राष्ट्रीय संयोजक मोहंम्मद फैजखान (रायपूर, छत्तीसगड) यांनी गोमाता हीच साऱ्या विश्वाची जननी असून, गोसेवेची असलेली द्वेषभावना प्रेमात परावर्तित करण्याची जनजागृती करताना समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचण्यासाठी १४ हजार किलोमीटरची गोसेवा सद्भावना पदयात्रा गत दोन वर्षांपासून आरंभली आहे. लद्दाखपासून कन्याकुमारी ते आता अमृतसरकडे आगेकूच करताना दोन वर्षात ११ हजार किलोमीटर अंतर पार करत त्यांचे आज रावेर शहरात आगमन झाले आहे.रावेर शहरात माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अ‍ॅड.सूरज चौधरी, सुशील पाटील, रौनक पाटील यांनी रावेर विकास युवा मंचतर्फे प्रा.मोहंम्मद फैजखान तसेच त्यांचे सहकारी पीयूष राय (उत्तर प्रदेश), बाबा परदेशी रामसाहू (छत्तीसगड ) व कैलास वैष्णव (राजस्थान) यांचे स्वागत केले.तब्बल दोन वर्षांपासून सुमारे साडेअकरा हजार किलोमीटर अंतर गोसेवा सद्भावनेसाठी पायी भ्रमंती करताना समाजातील अंतिम टोकावरील घटकांशी हितगुज साधताना ध्यानात आले की, देवनार, गोवा, मुंबई, केरळ या भागात गोहत्या सर्रासपणे मोठ्या प्रमाणात होत असल्याने सदरील भागात दुष्काळाच्या झळा कमालीच्या गंभीर व तीव्र आहेत. या भागातून पायी चालत येताना चार दिवस अंघोळीला पाणी मिळू न शकल्याने हवाई पाहणीतून दुष्काळाची पाहणी करणाºया सरकारला दुष्काळाची ही गंभीर दाहकता तरी कशी कळणार, असा सवाल राष्ट्रीय गोसेवा मुस्लिम प्रकोष्ठ मंचचे राष्ट्रीय संयोजक प्रा.मोहंमद फैजखान यांनी यावेळी व्यक्त केला.हिंदू धर्मातील गायीच्या धार्मिक महतीपलीकडे जावून पाहता गाय ही सबंध मानव कल्याणासाठी पंचमहाभूतांनी बनलेली अमृतसंजीवनी असून, ती कोणत्या एका जातीधर्मापुुरता मर्यादित नाही. शेती उत्पादनात वापरल्या जाणाºया नत्रयुक्त रासायनिक खतांमुळे कॅन्सरचा भस्मासुर फोफावला आहे. गायीचे शेण व मूत्र कॅन्सरवर रामबाण उपाय असून ब्रेनट्युमरच्या कॅन्सरवर गोमुत्राची मात्रा रामबाण ठरली आहे. म्हणून शेतीशिवारात नत्रयुक्त खतांऐवजी गायीचे शेणखत व गोमुत्राचा वापर करण्याची गरज आहे. गायीचे दूध, दही, तुप, गोमुत्र व शेण ही पंचगव्य पृथ्वी, जल, अग्नी, वायू व आकाश या पंचमहाभूतांसमान असल्याने वेदशास्त्रांनी गाय ही साºया विश्वाची जननी असल्याची दिलेली शिकवण मानवजातीला अमृत संजीवनी ठरली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.गोमातेचे मानवी जीवनाच्या कल्याणासाठी पर्यावरण व समाजस्वास्थ्यासाठी अनन्यसाधारण महत्त्व असल्याने व वेदशास्त्र, संत- मंहतांनी गोमाता ही साºया विश्वाची जननी असल्याची शिकवण दिली आहे. मोहंम्मद पैगंबरांनी गायीचे दुध व तुप हे मानवी जीवनासाठी नवसंजीवनी असल्याचे तर गोमांस हे रोगाचे माहेर असल्याची शिकवण दिली असल्याचे व ख्रिश्चन धर्मगुरू इसाहीमोही यांचा जन्मच गायीच्या गोठ्यात झाल्याचा संदेश देत गोमातेविषयी असलेला विद्वेष नाहीसा करून प्रेमाचे बीजारोपण या पदयात्रेतून करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :SocialसामाजिकRaverरावेर