मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जळगाव विमानतळावर स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 11:32 IST2018-10-08T11:32:22+5:302018-10-08T11:32:40+5:30
सोमवारी सकाळी जळगाव विमानतळावर आगमन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जळगाव विमानतळावर स्वागत
जळगाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोमवारी सकाळी जळगाव विमानतळावर आगमन झाले. त्यांच्या समवेत राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन होते.
विमानतळावर प्रशासनाच्यावतीने नाशिक विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. यावेळी महापौर सीमा भोळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील, आमदार स्मिता वाघ, सुरेश भोळे, चंदूलाल पटेल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर, महानगरपालिका आयुक्त चंद्रकांत डांगे आदी उपस्थित होते.
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्यावतीने कुलगुरु डॉ. पी. पी. पाटील यांनी पुष्पगुच्छ देवून मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत केले.