शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

‘वेलकम २०२०’ : डी.जे.वरील ठेका, फटाक्याची आतशबाजीत अनोख्या ‘टष्ट्वेंटी-टष्ट्वेंटी’ वर्षाचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 12:27 IST

सरत्या वर्षाला निरोप अन् नवर्षाचे स्वागत 

जळगाव : सरत्या वर्षाला ‘गुड बाय’ करत जळगावकरांनी डिजेच्या तालावर बेभान नृत्य करत नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत केले. कडाक्याचा थंडीतही तरुणाईचा उत्साहाला उधाण आले होते. मंगळवारी रात्री १२ वाजताच जोरदार फटाक्यांची आतषबाजी करत व एकमेकांना शुभेच्छा देत जळगावकरांनी नववर्षाचे स्वागत केले.नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांनी मंगळवारी दुपारपासून खास तयारी केलेली दिसून आली. ज्या रात्र जशी गडद होत जात होती. त्याच प्रमाणे तरुणाईचा उत्साह देखील शिगेला पोहचला होता. गेल्या काही दिवसांपासून कडाक्याचा थंडीमुळे रात्री ९ वाजेनंतर ओस पडणारे रस्त्यांवर रात्री उशिरापर्यंत वर्दळ दिसून आली. काव्यरत्नावली चौक, भाऊंचे उद्यान, महात्मा गांधी उद्यान, बहिणाबाई उद्यानासह मनपा परिसरातील खाऊ गल्लीतही विविध पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी जळगावकरांची गर्दी झाली होती. उत्साहाला गालबोट लागू नये ंंम्हणून पोलिसांचा बंदोबस्त होता.फॅमिली पार्टीसह मित्रांचा कट्टाही बहरलानववर्षाच्या स्वागतासाठी लहानग्यांपासून तर ज्येष्ठांमध्येही प्रचंड उत्साह दिसून आला. शहरातील उपनगरांमध्ये गच्चीवर ‘फॅमीली पार्टी’ रंगल्या होत्या. तर महाविद्यालयांच्या हॉस्टेलमध्ये देखील अनेकांनी पार्टीचे आयेजन करून नववर्षाचे स्वागत केले. तर काही ठिकाणी युवकांनी नेहमीप्रमाणे शहरात पार्टी न करता शहरानजिकच्या आसोदा, आव्हाणे, ममुराबादमधील शेतांमध्ये जावून भरीत पार्टीचा बेत आखला होता. तसेच पाळधी, नशिराबाद भागातील ढाब्यांवर देखील नागरिकांनी गर्दी केली होती.रात्रभर तरुणाई बेभाननव्या वर्षाच्या स्वागतासाठी शहरातील एमआयडीसी भागातील हॉटेल्समध्ये खास डीजे नाईट्स चे आयोजन करण्यात आले होते. लेझर शो मध्ये तरुणाईने अक्षरश बेभान होवून नववर्षाचे जोरदार स्वागत केले. प्रशासनाकडून पहाटे ५ वाजेपर्यंत हॉटेल्स सुरु ठेवण्याची परवानगी दिल्यामुळे रात्रभर जळगावकरांनी नववर्षाचा आनंदोत्सव साजरा केला. रात्री १२ वाजेनंतर सोशल मीडियावर देखील एकमेकांना शुभेच्छा देण्यात येत होत्या. त्यानंतर आकाशात जोरदार रंगबेरंगी फटाक्यांची आतषबाजी केली.चौकाचौकात मद्यपींवर कारवाईथर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर शहरात २२ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती तर मद्याच्या नशेत वाहन चालविणाऱ्यांविरुध्द ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हच्या केसेस करण्यात आल्या. रात्री ९ वाजेपर्यंत १० जणांना शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयात आणण्यात आले होते. ड्रेथ अ‍ॅनालायझरव्दारे त्यांच्या शरिरातील अल्कोहोलचे प्रमाण मोजण्यात आले. पहाटे चारपर्यंत बंदोबस्त होता.

टॅग्स :Jalgaonजळगाव