Weird ... officers on election duty for a year and a half | अजब...अधिकारी दीड वर्षांपासून निवडणूक ड्युटीवर
अजब...अधिकारी दीड वर्षांपासून निवडणूक ड्युटीवर

जळगाव : जिल्हा परिषदेतून भडगाव पंचायत समितीत बदली झालेले वरिष्ठ सहाय्यक लेखा अधिकारी हे गेल्या दीड वर्षापासून दिलेल्या जागी रूजू न होता, परस्पर तहसील कार्यालयात निवडणूक ड्युटीत असल्याचा प्रकार समोर आला आहे़ अकाऊंटच्या कामांना विलंब होत असल्याने आढावा घेतल्यानंतर हा प्रकार समोर आला़ विशेष बाब म्हणजे त्यांचा पगारही वेळेवर होत होता़
या अधिकाऱ्याबाबत आता गटविकास अधिकारी व तहसीलदारांकडून माहिती मागविण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत़ एखादा कर्मचारी किंवा अधिकाºयाची दोन ते तीन महिने इलेक्शन ड्युटी असू शकते मात्र, तब्बल दीड वर्ष बदली झालेले ठिकाण सोडून अन्य ठिकाणी रूज अधिकाºयाचा पगारही वेळेवर निघत होता, आधीच जिल्हा परिषदेच्या यंत्रणेत कर्मचाऱ्यांची कमतरता असताना असा प्रकार समोर आल्याने अधिकाºयांनी डोक्याला हात मारून घेतला आहे़ दरम्यान, दर महिन्याला अकाऊंट विभागाचा अहवाला द्यावा लागतो अशा स्थितीत कामांना विलंब का होत आहे, याचा आढावा वरिष्ठ पातळीवर घेण्यात आल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे़ या अधिकाºयाला सोडावे, अशी विनंती तहसीलकार्यालयाकडे जिल्हा परिषदेकडून करण्यात येणार असल्याची माहिती आहे़

Web Title: Weird ... officers on election duty for a year and a half

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.