आॅनलाईन लोकमतचाळीसगाव: दि.१९ : चाळीसगाव शहरासाठी पाणी पुरवठा करणाºया मुख्य जलवाहिनीला गुरुवार पासून तीन ठिकाणी गळती लागल्याने पाणी पुरवठा ठप्प झाला होता. सोमवारी तिन्ही गळती थांबविण्यात पालिका पाणी पुरवठा विभागाला यश आल्याने अखेरीस मंगळवारी सकाळपासून पाणी पुरवठा सुरळीत झाला आहे.गुरुवारी शहरापासून ४० कि.मी. अंतरावरील मुख्य जलवाहिनीला साकुर गावानजीक गळती लागली होती. यामुळे शहरातील पाणी पुरवठा ठप्प झाला होता. गळती थांबविण्यात आल्यानंतर जलवाहिनी पुन्हा दोन ठिकाणी गळती होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे रविवार पासून जलवाहिनी दुरुस्तीसाठी ३५ कर्मचाºयांची टीम युद्ध पातळीवर काम करीत होती. सोमवारी रात्री ट्रायल घेतल्यानंतर शहरातील सहा जलकुंभात १३ दशलक्ष लीटर पाणी भरण्यात आले. टप्प्या टप्प्याने शहरातील सर्व भागात मंगळवारी पाणी पुरवठा करण्यात आला. अशी माहिती मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी दिली.
चाळीसगाव शहराचा पाणीपुरवठा अखेर मंगळवारपासून सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 17:44 IST
मंगळवारपासून पाणी पुरवठा सुरळीत करण्यात पाणी पुरवठा विभागाला यश
चाळीसगाव शहराचा पाणीपुरवठा अखेर मंगळवारपासून सुरळीत
ठळक मुद्देमंगळवारी सकाळपासून पाणी पुरवठा सुरळीतसोमवारी तिन्ही गळती थांबविण्यात पाणी पुरवठा विभागाला यशचाळीसगाव शहरातील सहा जलकुंभात १३ दशलक्ष लीटर पाणी भरले