शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

जळगाव जिल्हा रुग्णालयात पाण्याविना रुग्ण व नातेवाईकांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 11:57 PM

बोअरिंग सुरू न केल्याने पाणपाईवरही ठणठणाट

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २० - जिल्हा रुग्णणालयातील बोअरिंग सुरू न केल्याने पाण्याच्या टाक्या भरल्या गेल्या नाही व त्यामुळे रुग्णालयातील पाण्याचा आधार असलेल्या पाणपोईतही पाणी उपलब्ध होऊ शकले नाही. त्यामुळे सकाळपासूनच रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे प्रचंड हाल झाले.जिल्हा रुग्णालयात पिण्याच्या पाण्याच्या ठिकठिकाणी चार पाण्याच्या टाक्या ठेवण्यात आलेल्या आहेत. यात बहुतांश वेळा पाणी उपलब्ध नसते. त्यामुळे सेवालयानजीक असलेल्या संत बाबा गुरुदासराम चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने उभारण्यात आलेल्या पाणपोईवर दररोज रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची पाण्यासाठी गर्दी होत असते.रविवारी मात्र जिल्हा रुग्णालयातील बोअरिंग सुरू न केल्याने या पाणपाईवरील पाण्याची टाकी भरली गेली नाही. त्यामुळे सकाळपासून येथे पाणी उपलब्ध न झाल्याने मोठे हाल झाले. प्रत्येक मिनिटा-मिनिटाला रुग्ण, त्यांचे नातेवाईक पाण्यासाठी बाटल्या घेऊन येत होते. मात्र पाणी नसल्याचे पाहून त्यांना माघारी परतावे लागले.नातेवाईकांनी बाहेरून आणले पाण्याचे जारपाणी मिळत नसल्याने अति दक्षता विभागात दाखल असलेल्या एका रुग्णाच्या नातेवाईकाने बाहेरून पाण्याचे जार विकत आणले. स्वत: ते पाणी पिण्यासह इतरही रुग्णांना पाण्याची मदत केली.दररोज पाच हजार लिटर पाण्याचा वापररुग्णालय परिसरातील सेवालयानजीकच्या या पाणपोईवर एक हजार लिटरची पाण्याची टाकी बसविलेली आहे. दररोज येथून पाणी नेले जात असल्याने दिवसातून ती पाच वेळा भरावी लागते. त्यामुळे येथून दररोज पाच हजार लिटर पाणी रुग्णांना उपलब्ध होते. मात्र आज बोअरिंगच सुरू न झाल्याने पाण्याचा थेंबही मिळू शकला नाही.

टॅग्स :WaterपाणीJalgaonजळगाव