मोसंबीला पाणी न देता दिले गावाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 18:22 IST2019-06-15T18:22:20+5:302019-06-15T18:22:26+5:30
जारगाव येथील शेतकऱ्याचे होतेय् कौतुक

मोसंबीला पाणी न देता दिले गावाला
पाचोरा : दुष्काळाच्या झळा तीव्र होत असून पाण्यासाठी ग्रामस्थ व्याकुळ झालेले असतानाच जारगाव शिवारातील शेतकºयाने मोठे मन करीत स्वत:च्या मोसंबीच्या बागेला पाणी देणे बंद करून जारगावला पाणीपुरवठा सुरू केला. याबद्दल कौतुक होत असून या शेतकºयाचे ग्रामस्थांनी आभार मानले आहे.
याबाबत वृत्त असे की, पाचोरा तालुक्यात तीव्र पाणीटंचाई आहे . पाणी कुठून उपलब्ध करावे हा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. जारगाव येथेही अशीच स्थिती असून सरपंच सुनील पाटील असून जारगाव शिवारातील शेतकरी जगन्नाथ बळीराम सोनार व त्यांचे बंधू देविदास सोनार , अनिल सोनार यांच्या शेतात पाणी उपलब्ध असल्याचे पाहून ते गावास कसे मिळेल? याचा विचार केला. मात्र सोनार यांच्या शेतात २५० मोसंबीची बहरलेली असून पाणी मागून शेतकºयाचा तोंडी आलेला घास हिरावणे योग्य नाही, असे वाटत असतानाही असतानाही सरपंच पाटील यांनी शेतकºयाचा मुलगा सुनील सराफ यांच्याकडे व्यथा मांडली. सुनील सराफ हे रा.स्व. संघाचे जबाबदार व्यक्ति असून त्यांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ घरी वडील , काका यांचेशी चर्चा करून मोसंबी जगविण्या पेक्षा मानव सेवा महत्वाची आहे, ही भूमिका घेत मोसंबीच्या बागेचे पाणी तोडून रखरखीत उन्हाळ्यात जारगावला मोफत पाणी जोडले. गावाचा पाणीपुरवठा सुरू झाला असून गावकऱ्यांची तहान भागली. विशेष म्हणजे पाण्याचा कोणताही मोबदला घेत नसल्याचे शेतकरी जगन्नाथ सराफ यांनी सांगितले.