शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

कजगावसह परिसरात चार वर्षांनंतर केटीवेयरला आले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 17:04 IST

अवकाळी पावसाने सर्व दूर नद्या-नाले ओसंडून वाहिले. दि.१९ रोजी चाळीसगाव परिसरात झालेल्या पावसामुळे तितूर नदी दुथडी भरून वाहिल्याने तब्बल चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कजगाव, उमरखेड, पासर्डीचे तिघे के.टी. वेयर ओसंडून वाहिल्याने ते पाहण्यासाठी तोबा गर्दी झाली होती.

ठळक मुद्देकजगाव, उमरखेड, पासर्डी येथे आनंदकाही ठिकाणी पिके पाण्याखालीकही खुशी तो कही गमके.टी. वेयर ओसंडून वाहिल्याने ते पाहण्यासाठी तोबा गर्दी

प्रमोद ललवाणीकजगाव, ता.भडगाव, जि.जळगाव : अवकाळी पावसाने सर्व दूर नद्या-नाले ओसंडून वाहिले. दि.१९ रोजी चाळीसगाव परिसरात झालेल्या पावसामुळे तितूर नदी दुथडी भरून वाहिल्याने तब्बल चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कजगाव, उमरखेड, पासर्डीचे तिघे के.टी. वेयर ओसंडून वाहिल्याने ते पाहण्यासाठी तोबा गर्दी झाली होती.सप्टेंबरच्या २० तारखेपर्यंत कजगावची तितूर नदी कोरडीच होती. दरम्यान, दि.२० सप्टेंबर रोजी कोरड्या तितूर नदीला अनेक अडथळे पार करीत चक्क चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पाण्याच्या धारीचे कजगावच्या तितूर नदीत आगमन झाले. या पाण्याचे स्वागताला सारेच आसूरलेले होते म्हणूनच भोरटेक येथे महिला व ग्रामस्थांनी जलपूजन केले तर कजगावच्या के.टी. वेयरमध्ये पाणी अडविण्यासाठी सारा गावच सरसावला. या दोघ गावात नदीवर तोबा गर्दी झाली होती. पाटणादेवीजवळ उगम असलेल्या तितूर नदीस कजगाव परिसरात गेल्या चार वर्षांपासून पाणीच आलेले नव्हते. यामुळे तितूर किनाऱ्यावरील बागायती संपुष्टात आली होती. पाणी प्रश्नदेखील बिकट झाला होता. चार वर्षांत नदीचे रूपांतर ओसाड जमिनीसारखे झाले होते.याआधी लोकवर्गणीतून नदी नांगरलीकजगाव येथे तितूर नदीचे रूपांतर ओसाड जमिनीसारखे झाले होते. यामुळे सामाजिक कार्यकर्ते दिनेश पाटील व ग्रामस्थांनी एकत्र येऊन लोकवर्गणी गोळा करून संपूर्ण नदीचे खोलीकरण करत पूर्ण नदी नांगरली होती. मात्र चक्क पावसाळा संपण्याच्या शेवटच्या टप्प्यातदेखील या नदीला पाणी न आल्याने या नदीने हिरव्या रानात रूप परिवर्तन केले होते. सर्व दूर हिरवेगार गवत नजरेस पडत होते.अनेक अडथळेतितूर नदीवर अनेक किकाणी सिमेंटचे पक्के बंधारे बनविण्यात आले आहेत. यामुळे या नदीचे पाणी पुढे सरकतच नसल्याने कजगावसह सात खेडे हे तितूरच्या पाण्यापासून वंचित होते. दि.१९ आॅक्टोबर रोजी झालेल्या पावसामुळे तसेच इतर सिमेंट बंधारे तुडुंब भरल्याने तितूरची धार कजगावपर्यंत पोहचली होती. जेमतेम आलेल्या या पाण्याचा साठोबा कजगावच्या के.टी. वेयरमध्ये व्हावा त्याला गळती लागू नये यासाठी ते पाणी कजगावात पोहचण्याच्या आधीच कजगावच्या युवकांनी या के.टी. वेयरच्या प्लेटांना प्लास्टिक कागदाचे आवरण चढवत पाणी गळतीपासून बचाव करण्यात आला. काही प्रमाणात या के.टी.मध्ये पाणी अडकले.दरम्यान, अवकाळी पाऊस सुरू झाला नि वातावरणदेखील बदलले. ज्वारी, बाजरी, मका आदी पीक काढण्याची लगबग शेतकऱ्यांची सुरू झाली. महिन्याच्या ब्रेकनंतर दि.१९ रोजी माघारी परतलेल्या पावसाचे दमदार आगमन झाले. धुवांधार झालेल्या पावसाने नद्या-नाले वाहिले. चाळीसगाव परिसरात झालेल्या पावसामुळे तितूर नदी दुथडी भरून वाहिल्याने या नदीवरील सारेच सिमेंट बंधारे ओसांडून वाहिले. परिणामी कजगाव, उमरखेड व पासर्डी येथील तिघे के.टी. वेयर तब्बल चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ओसांडून वाहिल्याने या भागाचा पाणी प्रश्न मिटणार आहे तर पुन्हा या भागातली लोप पावणाºया बागाईतला अच्छे दिन येणार अशी आशा शेतकºयांना वाटू लागली आहे.कही खुशी कही गमपरतीच्या पावसाचे दमदार आगमन झाल्याने काही शेतकºयांची चांगलीच फजिती झाली. कारण शेतकºयांनी ज्वारी, बाजरी, मका आदी पिके कापून ठेवली होती.दरम्यान, झालेल्या दमदार पावसामुळेही सारी पिके पाण्यात तरंगत आहेत. यामुळे शेतकºयांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे, तर दुसरीकडे या पावसामुळे कोरडवाहू शेतातील कपाशीला या पावसामुळे जीवदान मिळाले आहे. कपाशीचे उत्पन्न वाढू शकते तर फुटलेल्या, वेचणीवर आलेल्या बागाईत कपाशीचे या पावसामुळे नुकसान होईल. एकंदरीतच ‘कही खुशी कही गम’ असेच काहीसे चित्र या भागात पहावयास मिळत आहे.

टॅग्स :RainपाऊसBhadgaon भडगाव