पांझरा नदीच्या पुरामुळे अमळनेर तालुक्यातील पूल वाहून गेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 13:09 IST2019-08-07T12:44:16+5:302019-08-07T13:09:20+5:30
अक्कलपाडा धरणातून पाण्याचा विसर्ग

पांझरा नदीच्या पुरामुळे अमळनेर तालुक्यातील पूल वाहून गेला
अमळनेर, जि. जळगाव : पांझरा नदीला आलेल्या पुरामुळे अमळनेर तालुक्यातील मुडी-वालखेडा दरम्यानचा पूल वाहून गेला. या मुळे संपर्क तुटला आहे.
दरम्यान, धुळे येथील अक्कलपाडा धरणातून ८५१५ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हा विसर्ग वाढविण्यात येणार असल्याने पांझरा नदी काठावरील गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.
येत्या ४८ तासात पावसाचा जोर वाढणार असल्याने पांझरा नदी पात्रात अजून पाणी सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे नदी काठावरील गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.