नोकरदार, व्यावसायिक पती हवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 22:29 IST2019-11-04T22:28:08+5:302019-11-04T22:29:10+5:30
बारी समाज मेळाव्यात अपेक्षा : २७१ युवक, युवतींनी दिला परिचय

नोकरदार, व्यावसायिक पती हवा
जळगाव : नागवेल प्रतिष्ठानतर्फे रविवारी सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात आयोजित बारी समाजाचा वधु-वर परिचय मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी बहुतांश युवतींनी सरकारी नोकरी किंवा उत्तम व्यावसायिक पती मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली. राज्यभरातून विविध ठिकाणाहून आलेल्या २७५ युवक-युवतींनी यावेळी परिचय करुन दिला.
सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संत रुपलाल महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर आमदार सुरेश भोळे, मनपाच्या महिला व बाल कल्याण सभापती शोभा बारी, शेंदुर्णी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा विजया खलसे, नगरसेवक विष्णू भंगाळे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन बारी यांच्यासह मंगला बारी, नामदेवराव बारी, विठ्ठलराव बारी, अमृत खलसे आदी मान्यवर उपस्थित होते. यानंतर मान्यवरांच्या हस्ते परिचय पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
आमदार सुरेश भोळे यांनी मेळाव्याच्या माध्यमातून सर्व समाज बांधव एकत्रित येत असून, ही खुप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट असल्याचे सांगितले.
मेळावा यशस्वीतेसाठी बारी पंचमंडळाचे जळगाव शहराध्यक्ष लतिश फुसे, उपाध्यक्ष विजय अस्वार, सचिव सुनील काटोले, नागवेल प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष भरत बारी, सचिव प्रकाश रोकडे, कोषाध्यक्ष नरेंद्र बारी यांच्यासह अतुल बारी, अवधूत कोल्हे, भास्कर पाटील, सुरेश बारी, यशवंत बनसोडे, राजेंद्र कोल्हे, आनंदा सुने, पाडुरंग बारी, नामदेव आगे, उमेश धुरडे, अर्जुन बुंंदे, श्रीकृष्ण केदार, सतिश सुने, कुंदन बारी, विजू बारी, अर्जुन बारी, पवन बारी, गिरीश वराडे, अतुल बारी, आनंदा ढगे, निलेश नागपूरे, रवींद्र उंबरकर, रमेश डब्बे, विजय बारी आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. दीपक बारी, प्रकाश अस्वार, संगीता बारी, श्रृतीका बारी, कृष्णा बारी यांनी केले तर आभार प्रकाश रोकडे यांनी मानले.
पावणे तीनशे जणांंची होती उपस्थिती
४समाजाच्या नवव्या राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्यात राज्यातील विविध भागातील युवक-युवती व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये १५६ युवक व ११५ युवतींनी आपला परिचय करुन दिला. या मेळाव्यात विविध क्षेत्रातील उच्च शिक्षित युवक-युवतींनी सहभाग घेतला होता.