वाडे येथील जि. प. शाळा व्यवस्थापन समितीची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:17 IST2021-07-31T04:17:28+5:302021-07-31T04:17:28+5:30
भडगाव : तालुक्यातील वाडे येथील जि.प. मराठी मुलांची शाळा व मराठी मुलींची शाळा या दोन्ही शाळांच्या ...

वाडे येथील जि. प. शाळा व्यवस्थापन समितीची निवड
भडगाव : तालुक्यातील वाडे येथील जि.प. मराठी मुलांची शाळा व मराठी मुलींची शाळा या दोन्ही शाळांच्या सरपंच रजूबाई यशवंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शाळा व्यवस्थापन समिती दोन वर्षे मुदत संपल्याने दोन्ही शाळांत अध्यक्ष निवड झाली.
मुलांच्या शाळेत भगवान धर्मा माळी यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष म्हणून जयसिंग प्रतापसिंग परदेशी यांची निवड झाली व इतर पालक सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली. वाडे ग्रामपंचायतीकडून शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य म्हणून रवींद्र हिरामण चौधरी यांची नेमणूक करण्यात आली.
त्याचप्रमाणे जि.प. प्राथ. मराठी मुलींच्या शाळेत अध्यक्ष म्हणून चंद्रशेखर भिकन पाटील यांची, तर उपाध्यक्ष म्हणून शरद मोरे यांची निवड करण्यात आली. तसेच वाडे ग्रामपंचायतीकडून नलिनी परशुराम महाजन यांची शालेय समितीचे सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली. सरपंचांचा सत्कार शोभना राजेंद्र पाटील, मुलींच्या शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी केला. यशवंत बंकट पाटील यांचा सत्कार मुलांच्या शाळेचे मुख्याध्यापक रमेश हरी पाटील यांनी केला.