मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील मतदार राष्ट्रवादीच्या पाठीमागे भक्कमपणे उभा - एकनाथ खडसे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 17:06 IST2022-12-20T17:05:33+5:302022-12-20T17:06:29+5:30
जनतेतून निवडून आलेले हे सरपंच आहेत यामध्ये सहा ते सात ग्रामपंचायती मोठ्या आहेत.

मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील मतदार राष्ट्रवादीच्या पाठीमागे भक्कमपणे उभा - एकनाथ खडसे
जळगाव- मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील १३ ग्रामपंचायती पैकी १२ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे, राष्ट्रवादी काँग्रेस व माझ्यावर मतदारांनी विश्वास दाखवल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.
मुक्ताईनगर मतदारसंघांमध्ये शिंदे सेनेचा आमदार असून एकाही ग्रामपंचायतीवर शिंदे सेनेचा झेंडा फडकला नाही. मतदारांनी शिंदे सेनेला नाकारलेला आहे. दूध संघामध्ये आमच्या पॅनलचा पराभव झाला म्हणून नाथाभाऊ संपले अशी आवळी उठवली जात होती, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला.
जनतेतून निवडून आलेले हे सरपंच आहेत यामध्ये सहा ते सात ग्रामपंचायती मोठ्या आहेत. त्यामुळे हे सिद्ध झाले की मुक्ताईनगर मधील मतदार हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे.