Voluntary retirement accepted by the registrar | कुलसचिवांनी स्वीकारली स्वेच्छानिवृत्ती
कुलसचिवांनी स्वीकारली स्वेच्छानिवृत्ती

जळगाव- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलसचिव भ.भा.पाटील यांनी सोमवारी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली असून प्रा़ बी़व्ही़पवार यांच्याकडे प्रभारी कुलसचिवपदाचा पदभार देण्यात आला आहे.

५ आॅक्टोबर, २०१७ रोजी भ.भा.पाटील यांनी कुलसचिवपदाचा पदभार स्वीकारला होता. दरम्यान, त्यांनी स्वेच्छानिवृत्तीचा अर्जतीन महिन्यांपूवी सादर केला होता. सोमवारी त्यांना कार्यमुक्त करण्यात येऊन संगणकशास्त्र प्रशाळेतील माहिती व तंत्रज्ञान विभागप्रमुख प्रा.बी.व्ही.पवार यांच्याकडे प्रभारी कुलसचिवपदाचा पदभार देण्यात आला. प्रा़ पवार यांनी तात्काळ पदभार स्वीकारला. त्याप्रसंगी कुलगुरुप्रा.पी.पी.पाटील, प्र-कुलगरुप्रा.पी.पी.माहूलीकर, व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील, प्रा.प्रिती अग्रवाल, दीपक पाटील, प्रा.ए.बी.चौधरी, प्रा. एस.टी.इंगळे, प्रा.व्ही.एल.माहेश्वरी आदींची उपस्थिती होती़.

 

Web Title:  Voluntary retirement accepted by the registrar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.