विवेकानंद प्रीमियर क्रिकेट लीग उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:52 IST2021-02-05T05:52:55+5:302021-02-05T05:52:55+5:30
जळगाव : विवेकानंद प्रतिष्ठान निवासी विभागात विवेकानंद प्रतिष्ठान प्रीमियर क्रिकेट लीगचे आयोजन निवासी प्रमुख शशिकांत पाटील ...

विवेकानंद प्रीमियर क्रिकेट लीग उत्साहात
जळगाव : विवेकानंद प्रतिष्ठान निवासी विभागात विवेकानंद प्रतिष्ठान प्रीमियर क्रिकेट लीगचे आयोजन निवासी प्रमुख शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. लीगचे उद्घाटन निवासी प्रमुख शशिकांत पाटील यांनी केले. लीग सामन्याचे आयोजक विनोद एन. पाटील व स्वप्निल पाटील होते. पंच म्हणून महेश कुळकर्णी , दीपक पाटील, संतोष वाळसे विनोद पाटील यांनी काम पाहिले. यामध्ये एकूण पाच संघ सहभागी झाले होते. यात श्री गुरु इलेव्हन, रॉयल संभाजी, रॉयल काली, रॉयल खान्देश या संघाचा समावेश होता. अंतिम सामना रॉयल काली विरुद्ध रॉयल राम विरुद्ध रंगतदार झाला. या सामन्यात रॉयल कालीचा कर्णधार लोकेश बोंडे याने अष्टपैलु खेळ करीत आपल्या संघास अंतिम विजय मिळवून दिला. सामन्यांसाठी माधव सोनवणे, विजय पाटील,संजय वराडे, विनोद डी. पाटील, मधुसूदन जोशी, दुलारी प्रजापती, कृष्णा सत्रे, सागर पाटील, समाधान पाटील, पंकज पाटील यांचे सहकार्य लाभले.
जागतिक पाणथळ प्रदेश दिन साजरा
जळगाव : येथील के.के.उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये मंगळवारी जागतिक पाणथळ प्रदेश दिन साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक अकिल खान, मझहरोदीन शेख , नाझिया रफिक शेख उपस्थित होते. यशस्वितेसाठी राष्ट्रीय हरित सेना च्या विद्यार्थ्यानी परिश्रम घेतले.
राष्ट्रीय एकात्मता दिवस साजरा
जळगाव : जेसीआय जळगाव डायमंड सिटीतर्फे राष्ट्रीय एकात्मता दिन अध्यापिका महाविद्यालय येथे साजरा करण्यात आला. सुवर्णा चौधरी यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. तसेच जिनल जैन यांनी प्रास्ताविक केले. त्याप्रसंगी अध्यक्ष सुशील अगरवाल, सचिव सुवर्णा चौधरी, भारती काळे, ललित नेमाडे, अर्चना सूर्यवंशी,कुलदीप बुवा, विशाल शर्मा,राकेश कंडारे, योगेश वाणी, फिरोज शेख यांनी परिश्रम घेतले.