गावठी पिस्तुल बाळगणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 21:47 IST2020-06-29T21:46:50+5:302020-06-29T21:47:11+5:30
जळगाव : गावठी बनावटीचे पिस्तुल बाळगणाºया एकाला एलसीबीच्या पथकाने भुसावळ येथून अटक केली आहे़ अरबाज आरिफ पटेल (२२, रा़ ...

गावठी पिस्तुल बाळगणाऱ्यास अटक
जळगाव : गावठी बनावटीचे पिस्तुल बाळगणाºया एकाला एलसीबीच्या पथकाने भुसावळ येथून अटक केली आहे़ अरबाज आरिफ पटेल (२२, रा़ पटेल कॉलनी) असे पिस्तुल बाळगणाºया इसमाचे नाव आहे़
भुसावळ येथील खडका चौफुलीजवळील इकरा मदरसाच्या रस्त्यावर अरबाज हा गावठी बनावटीचे पिस्तुल घेऊन फिरत असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली होती़ त्यानुसार, सोमवारी त्याला अटक करण्यात आली.ी अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ गावठी बनावटीचे लोखंडी पिस्तुल, रिकामे मॅक्झीन आढळून आले़ त्यास ताब्यात घेण्यात आले असून याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही कारवाई एलसीबीचे पोलीस निरिक्षक बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अशोक महाजन, शरीफोद्दीन काझी, युनूस शेख, किशोर राठोड, रणजीत जाधव आदींनी केली़