गावठी दारुची वाहतूक करणाऱ्याला पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 21:19 IST2020-05-05T21:19:17+5:302020-05-05T21:19:42+5:30
जळगाव : समतानगरातून प्लॉस्टिकच्या कॅनमध्ये गावठी दारुची दुचाकीवरुन वाहतूक करणाºया संजय तुकाराम सपकाळे (४६,रा. समतानगर) यास एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी ...

गावठी दारुची वाहतूक करणाऱ्याला पकडले
जळगाव : समतानगरातून प्लॉस्टिकच्या कॅनमध्ये गावठी दारुची दुचाकीवरुन वाहतूक करणाºया संजय तुकाराम सपकाळे (४६,रा. समतानगर) यास एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी दुपारी ताब्यात घेतले आहे. कारवाईत पोलिसांनी दुचाकीसह १०५ लीटर गावठी दारु असा ४६ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र राजपूत, विजय नेरकर, मुकेश पाटील, सचिन पाटील, सचिन चौधरी यांच्या पथकाने मेहरुण स्मशानभूमी जवळून दुचाकी(क्र. एम.एच.१९ डी.एम.४२२३) अडकवली. दुचाकीला लटकविलेल्या कॅनमध्ये गावठी दारु आढळून आली. संजय सपकाळे यास ताब्यात घवून त्याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.