भडगावात महिलेची सोनपोत लांबविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 16:52 IST2018-09-28T16:48:16+5:302018-09-28T16:52:03+5:30
भडगाव शहरातील महालक्ष्मी कॉलनीत पायी फिरणाऱ्या ३३ वर्षीय महिलेच्या गळ्यातील चाळीस हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी पळविल्याची घटना २६ रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. त्यामुळे घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

भडगावात महिलेची सोनपोत लांबविली
भडगाव : शहरातील महालक्ष्मी कॉलनीत पायी फिरणाऱ्या ३३ वर्षीय महिलेच्या गळ्यातील चाळीस हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी पळविल्याची घटना २६ रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. त्यामुळे घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलीस सूत्रानुसार, शहरातील महालक्ष्मी कॉलनीत बुधवारी रात्री पायी फिरत असतांना रुपाली प्रशांत कुंभारे या महीलेची ४० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात लुटारूंनी पळवून नेल्याची घटना घङली.
याबाबत रुपाली कुंभारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस स्टेशनला अज्ञात लुटारूंविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे हे करीत आहेत.
दरम्यान, भररस्त्यावर महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लुटण्याच्या घटनेमुळे महिला वर्गात घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून अज्ञात चोरट्याच्या तपासाचे पोलिसांपुढे आव्हान उभे ठाकले आहे. तर अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलण्याची मागणी होत आहे.