विजू काम झाले.. म्हणताच अडकले तलाठी व कोतवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2019 12:16 PM2019-11-08T12:16:36+5:302019-11-08T12:16:59+5:30

एसीबीची नगरदेवळा येथे कारवाई : पाच हजाराची लाच

 Viju is done .. Talathi and Kotwal got stuck as they said | विजू काम झाले.. म्हणताच अडकले तलाठी व कोतवाल

विजू काम झाले.. म्हणताच अडकले तलाठी व कोतवाल

Next

जळगाव : विजू काम झाले...आता मी निघतो..असे म्हणताच शेतकऱ्याकडून पाच हजाराची लाच घेताना तलाठी मिलिंद जयवंत बच्छाव (५५, रा.कजगाव, ता.भडगाव) व कोतवाल विलास उर्फ कैलास काशिनाथ धिवरे (४५, रा.नगरदेवळा, ता.पाचोरा) या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. नगरदेवळा, ता.पाचोरा येथे गुरुवारी दुपारी ही कारवाई झाली.
तक्रारदार नगरदेवळा येथील तरुण शेतकरी आहे. त्यांच्या शेतात मका व कपाशी पीक लावलेले होते. ओल्या दुष्काळामुळे लागवडीचाही खर्च निघणे शक्य नाही, अशाही परिस्थितीत पिकांच्या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी तलाठी बच्छाव याने कोतवाल धिवरे याच्या माध्यमातून शेतकºयाकडे पाच हजाराची मागणी केली. पैसे दिल्याशिवाय पंचनामा न करण्याचा पवित्रा घेतल्यानंतर शेतकºयाने गुरुवारी थेट जळगाव येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय गाठले. उपअधीक्षक जी.एम. ठाकूर यांची भेट घेऊन तक्रार दिली. ठाकूर यांनी पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्याशी चर्चा करुन लागलीच पथक तयार केले. निरीक्षक संजोग बच्छाव, सहायक फौजदार रवींद्र माळी, मनोज जोशी, जनार्दन चौधरी,प्रशांत ठाकुर, नासीर देशमुख व महेश सोमवंशी यांच्या पथकाला घेऊन दुपारी नगरदेवळा गाठले. कोतवालाच्या माध्यमातून लाच घेतांना दोघांना रंगेहाथ पकडले. दोघांना अटक केली आहे. पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

दोघांच्या घराची झडती
तलाठी व कोतवाल या दोघांना पकडल्यानंतर उपअधीक्षक ठाकूर यांच्या पथकाने दोघांच्या घराची झडती घेतली. घरझडतीत नेमके काय आढळून आले याचा तपशील समजू शकला नाही. दरम्यान, दोघांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. भ्रष्टाचाराच्या बाबतीत काही तक्रारी असतील तर नागरिकांनी थेट तक्रार करावी असे आवाहन ठाकूर यांनी केले आहे.

Web Title:  Viju is done .. Talathi and Kotwal got stuck as they said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.