तापीकाठच्या गावांना सतर्कतेचा प्रशासनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 08:04 PM2020-08-14T20:04:55+5:302020-08-14T20:05:04+5:30

जळगाव - तापी नदीपात्रात पाण्याची सातत्याने आवक होत असल्याने पाणी पातळीत वाढ होत आहे. पुढील 72 तासापर्यंत पाणी पातळीत ...

Vigilance administration warns Tapikath villages | तापीकाठच्या गावांना सतर्कतेचा प्रशासनाचा इशारा

तापीकाठच्या गावांना सतर्कतेचा प्रशासनाचा इशारा

googlenewsNext


जळगाव- तापी नदीपात्रात पाण्याची सातत्याने आवक होत असल्याने पाणी पातळीत वाढ होत आहे. पुढील 72 तासापर्यंत पाणी पातळीत सतत वाढ होणार असल्याने तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

जळगाव जिल्ह्यातील हतनूर प्रकल्पाचे क्षेत्रात सतत सुरु असलेल्या पावसामुळे धरणाचे 24 दरवाजे पूर्ण उघडले असून 12 दरवाजे 1.00 मीटरने उघडण्यात आले आहे. त्यामुळे तापी नदीपात्रात 89748 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू राहणार आहे.

त्याचप्रमाणे जळगाव जिल्ह्यातील विसर्ग अजून वाढणार आहे. यासाठी पुढील 72 तासासाठी नागरीकांनी नदी काठावर जावू नये. आपली गुर-ढोरे नदीकाठी जावू देऊ नये व नदीकाठी असल्यास सुरक्षित स्थळी हलवावी. असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने केले आहे.

Web Title: Vigilance administration warns Tapikath villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.