महामार्गावरच्या कोरडय़ा झाडाने घेतला बळी

By Admin | Updated: June 20, 2017 17:25 IST2017-06-20T17:25:50+5:302017-06-20T17:25:50+5:30

वरणगाव : भरधाव दुचाकी आदळली

The victims took the dry trunk on the highway | महामार्गावरच्या कोरडय़ा झाडाने घेतला बळी

महामार्गावरच्या कोरडय़ा झाडाने घेतला बळी

ऑनलाईन लोकमत

वरणगाव,दि.20 - आशिया महामार्गावर फुलगाव फाटय़ानजीक महामार्गावरील झाडावर दुचाकी धडकल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला.
मुक्ताईनगरकडून भुसावळकडे दुचाकी (एम.एच.19-ए.यू.0278) ने भरधाव वेगाने जात असताना रात्री 11 वाजेच्या सुमारास महामार्गावर पडलेल्या लिंबाच्या झाडावर आदळल्याने दुचाकीस्वार विनोद प्रल्हाद न्हावदे (रा.कमळगाव, ता.चोपडा) हा गंभीर जखमी झाला़ त्याला उपचारार्थ वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्याची तयारी सुरू असताना मृत्यू झाला. 
ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिका:याची नियुक्ती नसल्याने उपचाराअभावी सप्ताहात दोन जणांचा मृत्यू ओढवल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. 
महामार्गाच्याकडेवरचे कोरडे झाड आठ दिवसांपासून वादळाने महामार्गावर पडलेले असताना पडलेल्या झाडाचे अवशेष महामार्गावरून उचलले नसल्यानेच अपघात झाल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला. 

Web Title: The victims took the dry trunk on the highway