शिंदी येथे ट्रॅक्टरने घेतला बालकाचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 20:15 IST2018-04-04T17:47:11+5:302018-04-04T20:15:37+5:30

आठ वर्षीय बालकाने स्वत: चावी फिरवित केले ट्रॅक्टर सुरु

The victim of the child took the tractor in Shinde | शिंदी येथे ट्रॅक्टरने घेतला बालकाचा बळी

शिंदी येथे ट्रॅक्टरने घेतला बालकाचा बळी

ठळक मुद्देट्रॅक्टर सुरु झाल्यामुळे घाबरून बालकाने मारली उडीचाकाखाली आल्याने विक्रम बिटा या बालकाचा दुदैवी मृत्यूट्रॅक्टरच्या मागच्या चाकाखाली दबून बालकाचा मृत्यू

आॅनलाईन लोकमत
खेडगाव.ता.भडगाव,दि.४- पारोळा-कजगाव मार्गालगतच्या शिंदी परिसरातील एका शेतात विक्रम रामसिंग बिटा (वय-८) या बालकाने ट्रॅक्टर सुरु केल्याने चाकाखाली येऊन त्याचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली.
माजी सरपंच वाल्मीक गोबा पाटील यांचे शेतावर सालदार म्हणुन असलेल्या अडावद -पांढरी (चोपडा तालुका) येथील रामसिंंग बिटा-संबेर यांचा तो मुलगा आहे. रामसिंग स्वता: औषध फवारणीसाठी ट्रॅक्टर जोडत होते. ते औषधी घेण्यासाठी बाजुला होताच मुलाने ट्रॅक्टरचा ताबा घेत चावी फिरविली. ट्रॅक्टर सुरु झाल्याचे पाहून त्याने घाबरुन उडी मारली. या दरम्यान मागच्या चाकाखाली हा बालक सापडला. चाकाखाली दबून त्या बालकाचा मृत्यू झाला. ट्रॅक्टर सुरु होऊन डाळीबांच्या बागेत घुसले. पाचशे मीटरपर्यंत ते गेल्यावर झाडाला ठोस देत थांबले. या प्रकरणाी मात्र भडगाव पोलिसात नोंद नाही.

Web Title: The victim of the child took the tractor in Shinde