अमळनेर व चोपडा तालुक्यातील ५० गावांतील नदी पात्रात वाहनांना बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 04:23 PM2019-12-20T16:23:09+5:302019-12-20T16:25:23+5:30

वाढत्या चोरट्या वाळू वाहतुकीवर निर्बंध घालण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांनी अमळनेर व चोपडा तालुक्यातील ५० गावांच्या नदी पात्रांमध्ये २१ डिसेंबरपासून २० फेब्रुवारीपर्यंत फौजदारी संहिता १९७३ नुसार कलम १४४ लागू करून नदी पात्रात वाहनांना बंदी घालण्यात आली आहे

Vehicles are banned in river basin in 5 villages of Amalner and Chopda taluka | अमळनेर व चोपडा तालुक्यातील ५० गावांतील नदी पात्रात वाहनांना बंदी

अमळनेर व चोपडा तालुक्यातील ५० गावांतील नदी पात्रात वाहनांना बंदी

Next
ठळक मुद्देफौजदारी संहितेनुसार नदीपात्रात १४४ कलम जारी२१ डिसेंबरपासून २० फेब्रुवारी २०२० पर्यंत निर्बंधप्रांताधिकाऱ्यांनी काढले आदेशतर वाहनांची होणार जप्तीयंदा पाऊस चांगला झाल्याने नदी पात्रात प्रचंड वाळू साठावाळूवर वाळूमाफियांचा डोळा

अमळनेर, जि.जळगाव : वाढत्या चोरट्या वाळू वाहतुकीवर निर्बंध घालण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांनी अमळनेर व चोपडा तालुक्यातील ५० गावांच्या नदी पात्रांमध्ये २१ डिसेंबरपासून २० फेब्रुवारीपर्यंत फौजदारी संहिता १९७३ नुसार कलम १४४ लागू करून नदी पात्रात वाहनांना बंदी घालण्यात आली आहे आदेशाच्या अंमलबजावणीच्या सूचना तहसीलदार,पोलीस निरीक्षक व गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
अमळनेर व चोपडा तालुक्यास तापी व अन्य उपनद्यांचे विस्तीर्ण पात्र लाभले आहे. विशेष म्हणजे यंदा पाऊस चांगला झाल्याने नदी पात्रात प्रचंड वाळू साठा झालेला आहे. या वाळूवर वाळूमाफियांचा डोळा असून चोरटी वाळू वाहतूक सर्रास सुरू आहे. पोलीस व महसूल प्रशासनालाही ही मंडळी दाद देत नसल्याचेच दिसत आहे.
बोरी, तापी पांझराचे पात्र
अमळनेर तालुक्यातील बोरी, तापी, पांझरा नदीतून अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात असून महसूल पथकातर्फे गौणखनिजावर कारवाई होत असली तरी हिंगोने खुर्द, फपोरे खुर्द, फापोरे बुद्रुक, बिलखेडे, कन्हेरे, खोकरपाट, बहादरवाडी, आमोदे, रंजाने, जळोद, सावखेडा, मठगव्हाण, नालखेडा, दोधवद, हिंगोने सिन प्र. अमळनेर, हिंगोणे प्र.जळोद, मुंगसे, रुंधाटी ,गंगापुरी, खापरखेडा, सात्री, डांगरी, बोहरे, कलाली, निम, शहापूर, तांदळी, ब्राम्हणे, भिलाली, बोदर्डे, कल्मबे, मुडी, मांडळ या गावांच्या नदी पात्रातून अवैधरित्या, चोºया करून वाळू वाहतूक होत आहे. रात्री बेरात्री ही चोरटी वाहतूक होत असल्याचे लक्षात येते.
प्रतिबंधात्मक आदेश
चोरट्या वाळू वाहतुकीचे प्रमाण लक्षात घेऊन आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून तापी, बोरी, पांझरा या नदीच्या पात्रात २१ डिसेंबरपासून ते २० फेब्रुवारी २०२० पर्यंत फौजदारी संहिता १९७३ नुसार कलम १४४ चे आदेश लागू करण्यात येऊन वाहनांना नदी पात्रात प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. फक्त पोलीस अधिकारी , महसूल अधिकारी यांच्या व शासकीय वाहनांना प्रवेश करता येईल असे आदेश उपविभागीय अधिकारी यांनी जारी केले आहेत. आदेशांच्या अंमलबजावणी संदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक व गटविकास अधिकाºयांना सूचना करण्यात आल्या आहेत.
तर वाहनांची होणार जप्ती
नदी पात्रात वाहने नेण्याच्या आदेशांकडे दुर्लक्ष केले गेल्यास संबंधीतांवर कठोर कायदेशिर कारवाईच्या सूचना पोलीस प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. खाजगी वाहनांनी नदी पात्रात प्रवेश केल्यास ती जप्त केली जाणार आहेत. त्याचप्रमाणे चोपडा तालुक्यातील बुधगाव, वाळकी, शेंदनी, मालखेडा, वढोदा, पिंपरी, कठोरा, कोलंबा, कुरवेल, खाचने, सुटकार, तांदलवाडी, दोंडवाडे, धूपे खुर्द, विचखेडा, घाडवेल, अनवर्दे आदी गावांनादेखील नदी पात्रात वाहनांना प्रवेश बंदी केली आहे.
वाळू लिलाव नाहीच
गेल्या अनेक दिवसांपासून नद्यांना पाणी असल्याने वाळू घाटांचा लिलाव झालेला नाही. तरी वाळूची सर्रास चोरी होत आहे. महसूल पथकातर्फे कारवाई होत असली तरी तहसीलदारांच्या घरावर पाळत ठेवून सफाईदारपणे पथक येण्यापूर्वी वाहने पळवली जात होती. याविषयी आमदार अनिल पाटील यांनी अधिवेशनातदेखील कारवाईची मागणी केली होती , बैलगाडी, टेम्पो आणि मालवाहतुकीच्या गाड्यांमध्ये पाण्याचे ड्रम ठेवून वाळू वाहतूक होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या मात्र उपविभागीय अधिकरायच्या आदेशाने वाळू वाहतूकदारांचे धाबे दणाणले असून कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: Vehicles are banned in river basin in 5 villages of Amalner and Chopda taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.